मुंबई – शहापूर (shahapur) आणि वसई (vasai) परिसरात बर्ड फ्लू (bird flue)आढळून आल्याने राज्य सरकारची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. चार दिवसापुर्वी शहापूर शहरातील एका ठिकाणी कोंबड्या मरत असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे निष्पण झाल्यानंतर त्यांना तात्काळ मारण्यात आलं. तसेच दोन दिवसापुर्वी वसईत सुध्दा हा प्रकार पुन्हा उघडकीस आल्याने पशुसंवर्धन विभागाने अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. तसेच बर्ड फ्लू वाढू नये यासाठी काळजी देखील घेणार असल्याचे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. बर्ड फ्लूचा विषाणु नेमका तयार कसा होता. त्याचा संसर्ग कसा होता. त्यावर उपाय योजना काय करायला हव्या याबाबत अनेक मार्गदर्शन करायला देखील सुरूवात केली असल्याची माहिती मिळत आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेळवली येथे काही कोंबड्या बर्डफ्ल्यूमुळे मृत्यूमुखी पडल्याचे आढळले आहे. बर्डफ्ल्यू वाढू नये, यासाठी प्रशासनामार्फत खबरदारी घेत असल्याचे @ThaneCollector राजेश नार्वेकर यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी दिलेली माहिती pic.twitter.com/P6HG7mnpIQ
— DISTRICT INFORMATION OFFICE, THANE (@Info_Thane1) February 18, 2022
1997 मध्ये बर्ड फ्लूचं पहिलं प्रकरण समोर आलं
हा विषाणु अनेकदा बदक किंवा बाहेरूण येणा-या पक्षांमध्ये प्रामु्ख्याने आढळून येतो. जे पक्षी बाहेर फिरतीवरती असतात त्यांच्यातून हा विषाणु इतर पक्षांवरती येत असतो. टोळीतल्या एका पक्षाला त्याची बाधा झाल्यानंतर तिथं असलेल्या सगळ्या पक्षांना त्याची बाधा होण्याची शक्यता असते. कारण शहापूर आणि वसई परिसरातील काही पक्षांना बाधा झाल्याचे निदान झाल्यानंतर तिथल्या जिल्हा पंशु संवर्धन विभागाने तात्काळ तिथल्या सगळ्या कोंबड्यांची आणि बदकांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला. बर्ड फ्लू हा आजार H1N1 या व्हायरसमुळे तयार होतो, त्याला एव्हियन इनफ्लूएन्झा म्हणतात. बाहेरून आलेल्या कोंबड्या आणि बदकांमुळे तो इतर पक्षात सामील होतो. विशेष म्हणजे तो माणसांना देखील होऊ शकतो. 1997 मध्ये बर्ड फ्लूचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं.
बर्ड फ्लूचं झाल्यानंतर काय करावं
राज्यात सध्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रकार घडून आलाय त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी तो पुन्हा डोकेवरती काढतोय का अशी अनेकांना शंका आहे. जिथं कोंबड्या तडफडून मरत असतील, तर त्यांची तिथल्या जिल्हा पशुसंवर्धन विभागात तक्रार दाखल करावी. त्यानंतर त्यांचे कर्मचारी तुमच्या मेलेल्या कोंबड्या तपासणीला पाठवतात. तुमच्या पोल्ट्री परिसरात तुम्ही काम करीत असताना पीपीई कीट आणि ग्लोज वापरणे अनिवार्य आहे. कारण त्यामुळे तुमच्या शरिराला कोणत्याही प्रकारची इचा व्हायचे शक्यता अत्यंत कमी असते. बर्ड फ्लू हा आजार माणसांना देशील श्वसनाच्या वाटेद्वारे होऊ शकतो.