राज्यात पुन्हा लंपी आजाराने डोकेवर काढले, शेतकऱ्यांनी त्याचं पशुधन कसं वाचवावे ? काय आहेत उपाय ?

| Updated on: Aug 31, 2023 | 5:33 PM

गुरांना होणाऱ्या लंपी आजाराने पुन्हा डोकेवर काढला आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक गुरांचा मृत्यू झाल्याने हा जिल्हा लंपीग्रस्त घोषीत केले आहे. पीडीत गुरांमध्ये लहान वासरांचा अधिक समावेश आहे.

राज्यात पुन्हा लंपी आजाराने डोकेवर काढले, शेतकऱ्यांनी त्याचं पशुधन कसं वाचवावे ? काय आहेत उपाय ?
lumpy virus
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : गुरांना होणाऱ्या संसर्गजन्य रोग लंपीने पुन्हा डोकेवर काढले आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये एकूण 5 लाख 2 हजार 428 गुरे आहेत, त्यातील 4 चार लाख 67 हजार जनावरांना लंपी प्रतिबंधक लसी देण्यात आल्या होत्या, म्हणजेच 93 टक्के लसीकरण झालेले आहे. तरीही लंपीचा प्रसार एवढ्या वेगाने होत आहे की 1 एप्रिलपासून आतापर्यंत 493 गुरांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने या आजारावर मोफत उपचार केले जात असल्याचे म्हटले जाते आहे.

नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक लंपीग्रस्त जनावरांना मृत्यू झाल्याने नांदेड जिल्ह्याला लंपी प्रभावित जिल्हा घोषीत केले आहे. लंपी आजाराने पीडीत गुरांमध्ये लहान वासरांचा समावेश आहे. पशु कल्याण विभागाने या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी तयारी सुरु केली आहे, सर्व पशू आरोग्य क्रेंद्रात लंपी बचावाची औषधे उपलब्ध केल्याचे सरकारने म्हटले आहे.

लंपी आजाराची लक्षणे काय ?

गायी आणि म्हशींना तो होतो. मात्र शेळ्यांमध्ये हा आजार पाहायला मिळालेला नाही. या आजारात जनावरांना हलका ताप येतो. पिडीत गुरांच्या शरीरावर गाठी तयार होतात. तोंडातून लाळ अधिक प्रमाणात पडू लागते. डोळे आणि नाकातून पाणी येऊ लागते. गुरांच्या पायांना सूज येते. त्यांच्या दूधाचे प्रमाण एकदम कमी होते. गुरांना वंध्यत्व, गर्भपात, न्युमोनिया, पांगळेपणाचा त्रास सहन करावा लागतो. लम्पी हा विषाणूजन्य त्वचा आजार आहे. त्याला लंपी स्किन डीसीज व्हायरस ( LSDV ) म्हणतात. त्याचे तीन प्रकार आहेत. पहीला कॅप्रीपोक्सव्हायरस, दुसरा गोटपॉक्स व्हायरस आणि तिसरा मेंढीपॉक्स व्हायरस असे तीन प्रकार आहेत.

लंपीवर उपचार काय ?

महाराष्ट्रात नांदेडमध्ये आजार पसरल्याने आता माझा गोठा, स्वच्छ गोठा असे मोहीम राबविली जात आहे. हा आजार डास आणि माश्या यासारख्या रक्त पिणाऱ्या किटकांमुळे हा आजार पसरतो. दुषित पाणी आणि चाऱ्यामुळे हा संसर्ग जनावरांना होतो. कोणत्याही प्राण्याला हा आजार झाल्याचे समजताच त्याला इतर प्राण्यांपासून स्वतंत्र ठेवावे. त्याचे पाणी आणि चारा इतर जनावरांना देऊ नये. ज्या ठिकाणी जनावरे ठेवतात ती जागा स्वच्छ राखायला हवी असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.