एकनाथ खडसे यांनी पक्षात यावं असं मी आव्हान केलेलं नाही, रक्षा खडसे यांचं घूमजाव

| Updated on: Feb 26, 2024 | 10:09 AM

एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षात यावं असं आवाहन केलेलं नाही, असा रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे. भाजप खासदार रक्षा खडसे यांनी आपल्याच विधानावरून हे घूमजाव केलं आहे. एकनाथ खडसे भाजपामध्ये येण्याबाबत जी कार्यकर्त्यांची भूमिका आहे, तीच माझी भूमिका आहे, असं वक्तव्य रक्षा खडसे यांनी केलं

एकनाथ खडसे यांनी पक्षात यावं असं मी आव्हान केलेलं नाही, रक्षा खडसे यांचं घूमजाव
Follow us on

जळगाव| 26 फेब्रुवारी 2024 : एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षात यावं असं आवाहन केलेलं नाही, असा रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे. भाजप खासदार रक्षा खडसे यांनी आपल्याच विधानावरून हे घूमजाव केलं आहे. एकनाथ खडसे भाजपामध्ये येण्याबाबत जी कार्यकर्त्यांची भूमिका आहे, तीच माझी भूमिका आहे, असं वक्तव्य रक्षा खडसे यांनी केलं आहे.

भाजपमधून बाहेर पडलेले नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून रंगल्या आहेत. त्यावर रक्षा खडसे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. महाराष्ट्रात आणि इतर राज्यात इतर पक्षाचे नेते भाजपमध्ये येत आहेत. अशोक चव्हाण यांचा देखील भाजपात पक्षप्रवेश झाला. नाथाभाऊ भाजपमध्ये आले तर आम्हाला आनंदच आहे. आधीही नाथाभाऊ हे भारतीय जनता पार्टीचे नेतेच होते. ते आल्याने आनंद होईल आणि कोणीही भाजपमध्ये आलं तर त्याचं स्वागतच केलं जाईल, असे विधान त्यांनी केलं होतं.

त्या विधानावरून घूमजाव

मात्र आता रक्षा खडसे यांनी या विधानावरून घूमजाव केलं आहे. ‘ एक लक्षात ठेवा, मी आवाहन केलेलंच नाही. मला सरळ पत्रकारांनी विचारलं नाथाभाऊ आल्यावर, तुमची प्रतिक्रिया काय ? नाथाभाऊ (पक्षात) आले तर जी कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया असेल, तीच माझी प्रतिक्रिया असेल, मी आवाहन वगैरे काहीही केलेलं नाही’, अशा शब्दांत रक्षा खडसे यांनी त्यांच्या वक्तव्यावरू न सरळ घूमजाव केलं.

नाथाभाऊ भाजपमध्ये यावं असं वक्तव्य करत खासदार रक्षा खडसे म्हणजेच एकनाथ खडसेंच्या सून यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र आता  या विषयावरून त्यांनी घूमजाव केलं.  गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे ठरवतील त्यांना काय करायचं आहे,  माझं मध्ये पडायचं यात कारणच नाही , असं त्या म्हणाल्या. या विषयाने पुन्हा रक्षा खडसेंच्या चर्चेत आल्या आहेत.