Aaditya Thackeray : सरकारचे माहित नाही पण मी तुमच्या बरोबर, राखेतून दिलासा देण्यासाठी आदित्य ठाकरेंची भूमिका काय?

| Updated on: Aug 27, 2022 | 5:10 PM

नागपूर शहरापासून जवळच असलेल्या नांदगाव परिसरात वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे राखेचे साम्राज्य असते. यावर आतापर्यंत कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. गावच्या-गाव राखेने माखलेले आहेत. एवढेच नाहीतर येथील पिण्याच्या पाण्यातही राख असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पर्यावरण मंत्री असताना अनेक वेळा बैठका घेतल्या पण प्रश्न मार्गी लागले नाहीत, याची खंत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Aaditya Thackeray : सरकारचे माहित नाही पण मी तुमच्या बरोबर, राखेतून दिलासा देण्यासाठी आदित्य ठाकरेंची भूमिका काय?
आ. आदित्य ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर : नागपूरातील नांदगावकर हे (Troubled by Rakhi) राखीमुळे त्रस्त आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची ही समस्या दूर झालेली नाही. बीड जिल्ह्यातील परळी येथील नागरिकांचीही हीच अवस्था आहे. या ठिकाणी अत्यावश्यक असलेली (Electricity) वीज मिळते पण या ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्न होत नाही, हे दुर्देव आहे. पण हा प्रदूषाणाची समस्या मार्गी लावण्यासाठी मी कायम आपल्यासोबत असल्याचे आश्वासन  (Aaditya Thackeray)आदित्य ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिले आहे. शिवाय आतापर्यंत राखीची समस्या ही ऐकीव होती पण आज प्रत्यक्ष गावात आल्यावर ही समस्या किती भयावह आहे हे देखील कळाले असेही ठाकरे यांनी ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर सांगितले. आता सरकारचे काय माहित नाही पण हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायम तुमच्यासोबत असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.

पिण्याच्या पाण्यातही राख

नागपूर शहरापासून जवळच असलेल्या नांदगाव परिसरात वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे राखेचे साम्राज्य असते. यावर आतापर्यंत कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. गावच्या-गाव राखेने माखलेले आहेत. एवढेच नाहीतर येथील पिण्याच्या पाण्यातही राख असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पर्यावरण मंत्री असताना अनेक वेळा बैठका घेतल्या पण प्रश्न मार्गी लागले नाहीत, याची खंत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. वीज निर्मितीमुळे विद्युत पुरवठा होतो पण येथील स्थानिकांचे प्रश्न काही वेगळेच असल्याचेही ठाकरे यांनी अनुभवले.

नांदगावप्रमाणेच परळीकरांची स्थिती

नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसरात वीज निर्मिती होते. त्यामुळे येथे राखेचे साम्राज्य आहे. याप्रमाणेच बीड जिल्ह्यातील परळीकर त्रस्त आहेत. गावोच्यागावे ही राखेने माखलेली आहेत. त्यामुळे आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे. या समस्या मार्गी लागणे गरजेचे होते पण या मुख्य समस्यांकडेच दुर्लक्ष होतेय हे आपले दुर्भाग्य असल्याचेही ठाकरे म्हणाले आहेत. पण आगामी काळात हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असेही आश्वासन त्यांनी नांदगाव ग्रामस्थांना दिले आहे.

डंम्पिंग बंद केले, आताही पाठपुरावा करणार

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री असताना येथील समस्यांबाबत ऐकीव होतो. त्यामुळेच येथील डंम्पिंग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, केवळ एका निर्णयावर येथील समस्या मिटणार नाही. तर कायमस्वरुपी तोडगा निघणे गरजेचे आहे. सरकार काय करेल ते माहित नाही पण हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कायम पाठपुरावा करणार असे आदित्य ठाकरे यांनी आश्वासन नांदगावकरांना दिले आहे.