Pooja Khedkar : खेडकर कुटुंबाला आणखी एक धक्का, बंगल्याची पोलिसांकडून झडती; काय सापडलं ?

| Updated on: Jul 20, 2024 | 9:05 AM

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय आणखीनच खोलात जात असल्याचे दिसत आहे. खेडकर कुटुंबीयांच्या बाणेरमधील ओम दीप बंगल्याची झडती घेतली. यावेळी पोलिसांनी तेथून अनेक गोष्टी जप्त केल्या.

Pooja Khedkar : खेडकर कुटुंबाला आणखी एक धक्का, बंगल्याची पोलिसांकडून झडती; काय सापडलं ?
Follow us on

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय आणखीनच खोलात जात असल्याचे दिसत आहे. वरिष्ठांच्या केबिनवर ताबा मिळवणं, खासगी गाडीवर लाल दिवा वापरणं, कोट्यावधींची संपत्ती असताना ओबीसी कोट्यातून यूपीएससी परीक्षा पास होणं, दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे आयएएसपद मिळवणं, असे गंभीर आरोप पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आले आहेत. त्यासंदर्भात रोज नवनवी माहिती समोर येत असताना पूजाच्या पालकांचेही कारनामे उघड होत आहेत. तिच्या आईला, मनोरमा खेडकर यांना नुकतीच अटक करण्यात आली तर तिचे वडील दिलीप खेडकर यांची एसीबीकडून चौकशी सुरू झाली आहे. त्यांच्या मागचा ससेमिरा काही थांबताना दिसत नसून आता आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. खेडकर दांपत्याच्या बाणेर येथील बंगल्याची पोलिसांकडून झडती घेण्यात आली आहे.

बंगल्याची झडती, काय सापडलं ? 

शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात पौड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून त्या फरार झाल्या. अखेर बऱ्याच तपासानंतर मनोरमा यांना रायगडमधील एका लॉजमधून अटक करण्यात आली आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा त्यांना 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. दरम्यान, ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी खेडकर यांच्या बाणेरमधील ओम दीप बंगल्याची झडती घेतली. यावेळी पोलिसांनी तेथून मनोरमा यांनी शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी वापरलेलं पिस्तूल, तीन काडतुसं जप्त केली. तसेच खेडकर यांनी त्यावेळी वापरलेली लँड क्रूझर गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली. ग्रामीण पोलिसांकडून बंगल्याची झडती सुरू चतु:शृंगी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

आज संपणार मनोरमा खेडकर यांची पोलीस कोठडी

काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये मनोरमा यांनी बंदूक दाखवून मुळशीतील शेतकऱ्याला धमकावल्याचं त्यात दिसत होतं. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर त्या फरार झाल्या. त्यांचा फोनही लागत नव्हता. अथक तपासानंतर पोलिसांनी अखेर गुरूवारी त्यांना रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमधून अटक केली. याप्रकरणी न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यावर त्यांना 20 जुलैपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी दिली होती . त्यांची कोठडी आज संपणार असून आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणर आहे.

यूपीएससीकडून पूजा खेडकरवर गुन्हा दाखल

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर हिची विविध पातळ्यांवर चौकशी सुरु असताना आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कारवाई सुरु केली. यूपीएससीकडून पूजा खेडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना तुमची आयएएसची निवड का रद्द करु नये? अशी नोटीस पाठवली आहे.