बदल्यांचा सपाटा, आधी 4 IPS, आता 5 IAS अधिकाऱ्यांची बदली, मंत्रालयापासून विदर्भापर्यंत मोठे बदल

| Updated on: Mar 26, 2021 | 9:15 PM

Maharashtra IAS Transfers : राज्याच्या राजकारणात बदल्यांवरुन रणकंदन उठलं असताना, IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरुच असल्याचं दिसतंय.

बदल्यांचा सपाटा, आधी 4 IPS, आता 5 IAS अधिकाऱ्यांची बदली, मंत्रालयापासून विदर्भापर्यंत मोठे बदल
मंत्रालय
Follow us on

IAS Transfers मुंबई : राज्याच्या राजकारणात बदल्यांवरुन रणकंदन उठलं असताना, IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरुच असल्याचं दिसतंय. कारण काही दिवसापूर्वीच 4 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर, आता 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मंत्रालयापासून ते विदर्भापर्यंत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. (IAS Transfers Maharashtras Thackeray government after IPS Param bir singh transfer)

1. श्री. लोकेश चंद्र (IAS Lokesh Chand), आयएएस (१९९३) यांना प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त केले गेले आहे.

२. श्री. राजीव कुमार मित्तल (IAS Rajeev Kumar Mittal), आयएएस (१९९८)) सचिव , वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई यांना आयुक्त, विक्रीकर, महाराष्ट्र राज्य, मुंबई म्हणून नियुक्त केले गेले आहे.

३) श्री अमोल येडगे (IAS Amol Yedge), आयएएस (एमएच: २०१)), मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, अमरावती यांना जिल्हाधिकारी, यवतमाळ म्हणून नियुक्त केले गेले आहे.

४) श्री.अविशांत पांडा (IAS Avishant Panda), आयएएस (एमएच: २०१)) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, तळोदा, नंदुरबार यांना सीईओ, जि.प., अमरावती म्हणून नियुक्त केले गेले आहे.

५) श्रीमती. वासुमाना पंत (IAS Vasumana Pant), आयएएस (एमएच: 2017) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, नंदुरबार यांना सीईओ, झेडपी, वाशिम म्हणून नियुक्त केले गेले आहे.

यापूर्वी IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

यापूर्वी 17 मार्चला मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या पोलीस  अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या.  राज्यात पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आले होते. राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे (Hemant Nagrale) हे नवे मुंबई पोलीस आयुक्त झालेत. तर रजनीश शेठ (rajnish seth)यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. तसेच संजय पांडे यांच्याकडे (Sanjay Pande) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आलीय. परमवीर सिंह (Paramveer singh)यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

संबंधित बातम्या  

केवळ परमबीर सिंगच नव्हे, चार बड्या अधिकाऱ्यांची बदली

पोलीस दलातलं पॉवरफुल पोस्टिंग ते थेट साईडलाईन, मुंबई कमिश्नर झालेल्या IPS अधिकाऱ्यांची अशी परंपरा?