बुलढाण्यातल्या शेगांव तालुक्यातील केस गळतीने ग्रामस्तांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परंतू केस गळती पाण्याने किंवा फंगल इन्फेक्शनमुळे झालेली नसल्याचे उघडकीस आले. आतापर्यंत या गावातील पाण्याचे अनेक नमूने तपासले आहेत. तरुण असो वा म्हातारे सर्वांचे केस गळत आहेत. आतापर्यंत या टक्कल पडण्याच्या घटनेचे बळी ठरलेल्यांची संख्या १३९ वर पोहचली आहे. या गावातील पाणी तपासल्यानंतर अहवाल आला आहे. या पाण्यात काही विशेष दोष आढळले नसल्याचे म्हटले जात आहे. तसेच फंगल इन्फेक्शन देखील यास जबाबदार नसल्याचे म्हटल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांना तपासण्यासाठी खास पथक मागविण्यात आले आहे.
बुलढाण्यातली बोंडगाव, कालवड, हिंगणा अशा ११ गावातील रहिवाशांमध्ये टक्कल व्हायरस पसरला आहे. त्यामुळे अनेकांचे केस गळत असल्याचे उघडकीस आले आहे. काही जणांना हा कुठला तरी व्हायरस आहे. तर काहींना यामागे पाणी जबाबदार असल्याचे म्हटले होते आहे. आधी लोकांना डोक्यात खाज येते. नंतर सरळ केसच हाती येतात आणि त्यानंतर थेट चक्क टक्कल पडत असल्याचे उघडकीस येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणात पाण्याचे नमूने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रभावित गावातील पाणी दूषित नसल्याचे उघडकीस आल्याने आणि हे फंगल इन्फेक्शन नसल्याचेही उघड झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील ११ गावांतील नागरिकांची केस गळती का होत आहे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. कारण बाधित गावांतील पाण्याच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. या पाण्यात आर्सेनिक, लीड, मर्क्युरी आणि कॅडमियम हे हेवी मेटल्स आढळून आलेले नाहीत. मात्र काही गावात नायट्रेटचे प्रमाण आढळून आले आहे. तसेच स्कीन बायोप्सीमध्येही सकृत दर्शनी फंगल इन्फेक्शन नसल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे ही केस गळती नेमकी का होते? या प्रश्नाच्या उत्तर शोधण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर ) पथक दिल्लीतून उद्या ( सोमवारी ) बुलढाणा जिल्ह्यात दाखल होत आहे. परिणामी, केसगळतीच्या कारणाचे गूढ अद्यापही कायम आहे. त्यामुळे बाधित गावकऱ्यांसह आरोग्य विभागाची चिंता आणखीनच वाढली आहे.