नेत्यांमध्ये चलबिचल झाली तर, पवार साहेबांना सांगू इच्छुतो, रोहित पवार यांची थेट मागणी काय?

| Updated on: Dec 02, 2023 | 10:46 PM

आमदार रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. एक्झिट पोलमध्ये जे काही अंदाज वर्तविण्यात आले आहेत. यावर बोलताना ते म्हणाले. पाचही ठिकाणी काँग्रेसचा विजय होणार आहे.

नेत्यांमध्ये चलबिचल झाली तर, पवार साहेबांना सांगू इच्छुतो, रोहित पवार यांची थेट मागणी काय?
ROHIT PAWAR AND SHARAD PAWAR
Follow us on

वाशिम | 2 डिसेंबर 2023 : निवडणुका आल्या की काही लोक नाटक करतात. सोयीचे राजकारण करतात. 2013 साली देवेंद्र फडणवीस गाडीभर पुरावे घेऊन अधिवेशनात आले होते. त्यावेळी बैलगाडीच्या चाकांच्या रेषा दिसल्या. मात्र, पुरावे काहीच दिसले नाहीत. लोकं तुमच्या विरोधात बोलतात तेव्हा तुम्हाला ईडी, सीबीआयची भीती दाखविली जाते. पण, ते तुमच्याकडे आले की ते दुधासारखे पवित्र होतात, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा आजचा १७ वा दिवस आहे. वाशिम जिल्ह्यात ही यात्रा पोहोचली आहे. वाशीम जिल्ह्यातील पारगाव येथील श्री भवानी देवी मंदिर येथे आमदार रोहित पवार यांनी सहकुटुंब आरती केली. त्यानंतर त्यांची संघर्ष यात्रा सुरु झाली. या यात्रेत रोहित पवार यांचे संपूर्ण कुटुंब युवा संघर्ष यात्रेत सहभागी झाले होते.

संघर्ष यात्रा सुरु होण्यापूर्वी रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. एक्झिट पोलमध्ये जे काही अंदाज वर्तविण्यात आले आहेत. यावर बोलताना ते म्हणाले. पाचही ठिकाणी काँग्रेसचा विजय होणार आहे.

उद्या पाच राज्यातील निकाल येणार आहेत. पाच राज्याच्या निकालानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या नेत्यांमध्ये चलबिचल होणार आहे असा दावा रोहित पवार यांनी केला. पण, मी शरद पवार साहेबांना सांगू इच्छुतो की संकटाच्यावेळी जे निष्ठावन सोबत आहेत त्यांचाच विचार आपण करावा, असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याच मुद्यावर बोलताना जे एकदा गेले ते परत येत नाही. त्यामुळ मी त्यांची चिंता करत नाही. जे समोर आणि आपल्यासोबत आहेत, मी फक्त त्यांचाच विचार करतो असे म्हटले आहे. अ, ब, क आणि ड गेले तरी चालतील. कारण, आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. त्यामुळे आम्हाला कशाची चिंता नाही. पवार साहेबांमुळं राष्ट्रवादी काँग्रेसची नौका कधीच बुडू दिली नाही, पुढं ही ती बुडणार नाही.

पवार साहेबांची साथ सोडून गेलेले आज स्पष्टीकरण देतायेत. आपल्याला त्याची फिकीर करायची गरज नाही. आपण जनतेसोबत राहून ताकद दाखवली की तीच जनता आपल्याला आज ना उद्या सत्ता देईल. सध्या आपल्याला बिघडलेली सामाजिक घडी सुरळीत करायची गरज आहे असे जयंत पाटील म्हणाले.