IMD Monsoon Update : या वर्षी देशात किती पाऊस पडणार? आयएमडीचा मान्सूनबाबत पहिला अंदाज समोर

| Updated on: Apr 07, 2025 | 6:25 PM

या वर्षी देशासह राज्यात पावसाचं प्रमाण कसं असणार याबाबतचा आयएमडीचा पहिला अंदाज समोर आला आहे.

IMD Monsoon Update : या वर्षी देशात किती पाऊस पडणार? आयएमडीचा मान्सूनबाबत पहिला अंदाज समोर
Rain
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

भारतीय हवामान विभागाकडून (IMD) या वर्षी मान्सूनवर पडणाऱ्या एल निनोच्या प्रभावाची शक्यता नाकारण्यात आली आहे. एल निनोमुळे मान्सूनच्या पावसावर मोठा प्रभाव पडतो. मान्सूच्या प्रमाणात घट होते. एल निनोची निर्मिती ही प्रशांत महासागराचं तापमान वाढल्यामुळे होते. एल निनोचा परिणाम हा भारतात मान्सून दरम्यान पडणाऱ्या पावसावर होत असतो. एल निनोमुळे भारतातील पर्जन्यमानामध्ये सरासरीच्या तुलनेत घट होते. दरम्यान सोमवारी भारतीय हवामान विभागाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आयएमडीचे संचालक एम महापात्रा यांनी म्हटलं आहे की, हवामान अंदाज तसेच आंतरराष्ट्रीय अंदाज या आधारावर आपण असं म्हणू शकतो की, यावर्षी मान्सूनवर एल निनोचा प्रभाव पडणार नाही.यावर्षी आपल्याला न्यूट्रल परिस्थिती पाहयला मिळू शकते. त्यामुळे देशात यंदा सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान 2023 मध्ये एल निनोचा मोठा प्रभाव हा मान्सूनवर पडल्याचं पाहायला मिळालं होतं. एल निनोमुळे मान्सूनच्या प्रमाणात सरासरी 8 टक्के घट झाली होती. तर गेल्या वर्षी ना निनाच्या प्रभावामुळे 8 टक्के अतिरिक्त मान्सूनचा पाऊस पडला. ज्याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसल्याचं पाहायला मिळालं. 2023 मध्ये एल निनोमुळे कोरडा दुष्काळ होता तर 2024 मध्ये ना निनामुळे ओला दुष्काळ होता. मात्र यंदा सरासरी इतकाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

देशभरात उष्णतेची लाट

पुढे बोलताना महापात्रा यांनी असं देखील म्हटलं आहे की, यावर्षी मान्सून सामान्य होण्याचा अंदाज आहे. मात्र त्यापूर्वी एप्रिल ते जून या कालावधीमध्ये देशभरात हिट वेव्हचा तडाखा बसू शकतो. तापमान सरासरी पेक्षा अधिक असणार आहे. देशातील काही भागांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या देखील वर जाऊ शकतं. हे तापमान सरासरी तापमानाच्या तुलनेत 5 अंश सेल्सिअसने अधिक आहे. पूर्व उत्तर भारतामध्ये प्रचंड उष्णता पाहायला मिळू शकते असं त्यांनी यावेळी म्हटलं, महाराष्ट्रात देखील पुढील दोन महिने प्रचंड उकाडा जाणवणार आहे. सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे.