Sanjay Raut : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, खासदार संजय राऊत यांची मागणी, 2 आठवडे झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार का नाही?

| Updated on: Jul 16, 2022 | 9:54 PM

राज्यात सरकार स्थापून दोन आठवडे झालेत. दोनच मंत्र्यांनी शपथ घेतली. हे राज्यघटनेला धरून नाही. राज्यपाल महोदय हे काय सुरू आहे, असं संजय राऊत यांनी ट्वीट केलंय.

Sanjay Raut : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, खासदार संजय राऊत यांची मागणी, 2 आठवडे झाले तरी मंत्रिमंडळ विस्तार का नाही?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यापाल कोश्यारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा राज्य सरकारवर तोफ डागली. राज्यात राष्ट्रपती लागवड लागू करावी, अशी मागणी त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे. राज्यपाल महोदय, संविधानाच्या नियमांची अमलबजावणी होत नसल्याचं राऊत म्हणालेत. संजय राऊत म्हणतात, बारबाडोसची लोकसंख्या अडीच लाख आहे. तरीही तिथं 27 कॅबिनेट मंत्री (Cabinet) आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. इथं फक्त दोन कॅबिनेट आहेत. हा विवादात्मक निर्णय आहे. राज्यघटनेच्या (Constitution) नियमांचे अंमलबजावणी होते काय, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. या सरकारच्या योग्यतेबद्दल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) निर्णय देणार आहे. तोपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

राज्यपाल महोदय काय सुरू आहे

भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 (1-a) नुसार मुख्यमंत्र्यांसह राज्यातील कॅबिनेटची संख्या 12 पेक्षा कमी नसावी. राज्यात सरकार स्थापून दोन आठवडे झालेत. दोनच मंत्र्यांनी शपथ घेतली. हे राज्यघटनेला धरून नाही. राज्यपाल महोदय हे काय सुरू आहे, असं संजय राऊत यांनी ट्वीट केलंय.

घटनातत्ज्ञ म्हणतात, राज्याला हा नियम लागू होत नाही

राऊतांनी जो 164 1A चा दाखला दिला तो महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांना लागू होत नाही. बहुमत असलेल्या सरकारला राष्ट्रपती राजवट लावून काढून टाकता येत नाही. त्यामुळं राऊतांनी केलेल्या दोन्ही मागण्या चुकीच्या असल्याचं घटनातत्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलंय.