मुंबई – चिपळूण (Chiplun) मधील कळकवणेमध्ये (Kalkavत स्थळी हलवले आहे. डोंगराला मोठ्या भेगा पडल्यामुळे गावकरी अधिक चिंतेत आहेत. एनडीआरएफच्या (NDRF) जवानांनी केली घटनाan) एनडवाडीतल्या वस्तीच्या मागील डोंगराला 4 फुटापर्यंत भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ अधिक भयभीत झाले आहेत. त्यांनी ही माहिती स्थानिक प्रशासनाला कळवली असून तात्काळ नियोजन करावं अशी मागणी केली आहे. एनडवाडीतल्या ग्रामस्थांना प्रशासनाने सुरक्षिस्थळाची पाहणी केली आहे. त्यामुळे धोकादायक कुटुंबांना स्थलांतरण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे एनडीआरएफच्या जवानांनी तिथल्या ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर केली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये एक आधार निर्माण झाला आहे. मागच्या आठ दिवसांपासून कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक परशुराम घाटात पूर्ण बंद ठेवण्यात आला आहे. 4 तारीखेला या घाटात दरड कोसळल्या नंतर घाट केवळ 2 वेळा 1 तासा साठी खुला करण्यात आला होता. मात्र घाट बंद असल्यामुळं अवजड वाहनांच्या रांगा चिपळूण आणि खेर्डी या भागात वाढत आहेत यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. 4 तारीखेला परशुराम घाट बंद करण्याचा निर्णय झाला. सलग 5 दिवस घाट बंद होता . अवजड वाहनांच्या रांगा वाढत होत्या म्हणून 6 दिवसांनी घाट फक्त 1 तास साठी चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यानंतर लगेच घाट बंद करण्यात आला. यानंतर घाट 12 तारीखेला सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं. पण 12 तारीखेला घाट सुरू झाला नाही म्हणून वाहन चालक रोडवर उतरले. त्यावेळी पोलिस आणि चालक यांच्यात राडा झाल्याचे समजले.
रत्नागिरीतील अणुस्कूरा घाटात कोसळलेली दरड अद्याप हटवलेली नाही. पावसामुळे प्रचंड व्यत्यय येत असल्याचे समजले आहे.
त्यामुळे अणुस्कूराघाटातील वाहतूक पुर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. राजापूर मार्गे कोल्हापूरला जोडणारा हा घाट बंद आहे. मुसळधार पावसाचा परिणाम कोकणातील घाट रस्त्यांवर देखील झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोकण पट्ट्यात नद्यांना पूर आला आहे. त्याचबरोबर घाट रस्त्यातील अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.