लातूर : कोरोनानंतर (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे वेगळेपण काय? याची उत्सुकता सर्वच आंबेडकरी अनुयायींना लागली होती. पण म्हणतात जे जे नवं ते लातुरकरांना हवं असाच काहीसा उपक्रम लातुरात पार पडला आहे. शिक्षण क्षेत्रात (Latur) ‘लातूर पटर्न’ची वेगळी अशी ओळख आहे. पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त जो उपक्रम लातुरकरांनी राबवला आहे त्यामुळे जिल्ह्याची ‘इमेज’ वाढली आहे. केवळ जयंतीच्या काळातच नाही तर इतिहासात नोंद होईल असा महामानवाचा 70 फुटी ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’च्या (Statue) पुतळ्याचे अनावरण जयंतीच्या पुर्वसंध्येला करण्यात आले होते. या अनोख्या उपक्रमाची चर्चा जयंतीच्या दिवशी सबंध राज्यभर होत आहे हेच लातूरचे वेगळेपण असल्याचे प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये महामानवाचा 70 फुट उंचीचा ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हे कुण्या मेट्रो शहरातील कारागीराची कौशल्य नाही तर लातूरच्या मातीमध्येच ज्याच्या जडणघडण झाली त्याचे आहेत. हा पुतळा उभारणीसाठी 1 महिन्याचा कालावधी लागला असून यासाठी 50 कारागीर हे दिवस रात्र मेहनत घेत होते. ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ही संकल्पना घेऊन सुरु करण्यात आलेले काम जयंतीच्या पुर्वसंध्येलाच पूर्ण झाले होते. याकरिता 1400 किलो स्टील, 1400 किलो पीओपी, 3570 किलो फायबर आणि 200 लिटर पेंट वापरले गेले आहे.
70 फुट उंचीचा ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ भव्य पुतळ्याचे अनावरण होताच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे तो लेझर शो आणि थ्री मॅपिंग. गेल्या पंधरा दिवसांपासून हा पुतळा कशा प्रकारचा असेल याचे आकर्षण लातुरकरांना लागले होते. अरविंद पाटील-निलंगेकर आणि शंकर श्रृंगारे यांच्या निगराणीखाली काम सुरु होते. अखेर महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर हा भव्यदिव्य पुतळा साकारण्यात आला. लेझर शो आणि थ्री मॅपिंगमुळे या वेगळीच किनार लाभली आहे. अनावरण झाल्यांनतर या अनोखा असा पुतळा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ हा पुर्णाकृती पुतळा उभारण्याची मूळ संकल्पना खा. सुधाकर श्रृंगारे यांची. कोरोनाचे निर्बंध शिथील होताच यंदाची जयंती वेगळ्या अंदाजात साजरी करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. याकरिता वेळ कमी असला तरी लातूरचे वेगळेपण दाखवून देण्याचा प्रयत्न झाला आहे. स्वतंत्र यंत्रणा, कार्यकर्त्यांचे श्रम आणि योग्य नियोजन यामुळेच कमी कालावधीत हा पुतळा उभारणे शक्य आहे. तर हा पुतळा मोदी सरकारच्या सामाजिक सद्भावाच्या धोरणाचे आणखी एक प्रतीक व प्रेरणास्थान बनेल, राज्यातील सर्वात उंच पुतळा म्हणून याची नोंद होणार आहे अशी माहिती खा. सुधाकर तुकाराम श्रृंगारे यांनी दिली आहे.
आतापर्यंत अनेक गोष्टींमधून लातुरकरांनी आपले वेगळेपण जोपासले आहे. हा ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’देखील त्याचाच एक भाग आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाल्याचे भाग्य मला लाभले असल्याचे अनावरण प्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस म्हणाले. महोपौर झालो तेव्हा दीक्षाभूमीचा विकास करता आला. मुख्यमंत्री झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देता आली आणि आता या पुतळ्याचे अनावरण करता आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले भाजपा नेते गिरीश महाजन, खा. सुधाकर श्रृंगारे, आ. संभाजी पाटील-निलंगेकर, आ.अभिमन्यू पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
Eknath Khadse Kirit Somaiya Video: जेव्हा खडसे आणि सोमय्या गायला लागले, ए दोस्ती हम नही छोडेंगे!
Eknath Khadse : मी मित्रत्वाचे नाते जपले, त्यांनी मात्र कुभांडच रचले; खडसेंची फडणवीसांवर टीका