नागपूर : “राज्यातील ओबीसी समाजात असंतोष आहे. ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मेळावे घेणार आहे. नागपुरातही ओबीसींचा महामेळावा होईल. या मेळाव्यात राज्यभरातून तब्बल 1 लाख लोक येणार आहेत,” असे सांगत ओबीसींच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे सूतोवाच मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले. ते नागपूरमध्ये ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.(Nagpur in OBCs Convention 1 lakh people will come said Vijay Wadettiwar)
राज्यात मराठा आणि ओबीसी समाज आरक्षण तसेच इतर मुद्द्यावरुन आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित राहायला हवे अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. तसेच, भरती प्रक्रियेवरुनसुद्धा ओबीसी समाजातील युवकांमध्ये असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी राज्यातील ओबीसी समाजामध्ये असंतोष असल्याचे सांगत यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसींचे मेळावे घेणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच, नागपुरात ओबीसींचा महामेळावा आयोजित केला जाणार असून त्यासाठी राज्यातून एक लाख लोक येतील असेही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले राष्ट्रीवादीचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मराठा संघटनांनी मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन या दोन्ही नेत्यांचे राजीनामे घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगावं अशी विनंती केली होती.
विजय वडेट्टीवार यांच्यासोबत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हेसुद्धा महावितरणमधील भरती प्रक्रियेवरुन आक्रमक झाले आहेत. महावितरणमध्ये 5 हजार तरुणांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर करावी अशी मागणी त्यांनी केलीय. “राज्य सरकारने गरीब मुलांची भरती प्रक्रिया रोखली आहे. ही भरती थांबवू नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. तरीसुद्धा भरती प्रक्रिया घेतली जात नाहीये,” असा आरोप शेंडगे यांनी केलाय.
तसेच, EWS चा निर्णय झालेला आहे. तरीदेखील राज्याने भरती का थांबवली असा सवालही त्यांनी राज्य सरकारला केला. ऊर्जामंत्री नितीन थोरात यांनी भरती करु असं आश्वासन दिलं होतं. मात्र, याबद्दल त्यांना विचारायला गेलं की ते ऑफिसमध्ये लपून बसतात अशी खोचक टीका शेंडगे यांनी नितीन थोरात यांच्यावर केली आहे.
संंबंधित बातम्या :
(Nagpur in OBCs Convention 1 lakh people will come said vijay wadettiwar)