पुण्यात घरांच्या खरेदी दरात तीन टक्क्यांची वाढ, आणखी दरवाढ होण्याची क्रेडाईनं व्यक्त केली शक्यता

| Updated on: May 25, 2022 | 8:49 AM

या चालू आर्थिक वर्षातील जानेवारी ते मार्च या कालावधीत देशातील सगळ्यात मोठ्या आठ शहरात घरांचे दर हे वाढलेले दिसून येत आहे. देशातील या आठ शहरात घरांचे दर हे 5 ते 6 टक्क्यांनी वाढल्याचेही पहायला मिळत आहे.

पुण्यात घरांच्या खरेदी दरात तीन टक्क्यांची वाढ, आणखी दरवाढ होण्याची क्रेडाईनं व्यक्त केली शक्यता
घर
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : ग्रामिण भागातील मानसाचे एक स्वप्न असते की आपले ही पुण्या-मुंबईत घर असावे. मात्र हे स्वप्न आता स्वप्नच राहील की काय अशीच स्थिती पुण्यात निर्माण झाली आहे. याचे कारण वाढती महागाई (Inflation) आहे. आणि या वाढत्या महागाईमुळे घरांच्या किंमतीत किंवा घर (House) बांधण्यासाठी लागणाऱ्या मटेरियलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. या दरवाढिचा फटका थेट सामान्यांना बसत आहे. त्यामुळे स्वत:चे हक्काचे घर खरेदी करण्याचे किंवा बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक वाईट बातमी आहे. कारण घरांच्या किंमतीत (Home prices Rise) तब्बल 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासंदर्भात पुण्याच्या क्रेडाईनं आपले मत व्यक्त केले असून त्यांनी याबाबत एक सर्वे केला होता. त्यावरून ही माहिती देण्यात आली आहे.

सहा ते नऊ महिन्यात पुन्हा दरवाढ

तसेच क्रेडाईने केलेल्या सर्वेक्षणात पुढील सहा ते नऊ महिन्यात पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर ही वाढ किमान पाच ते दहा टक्क्यांनी वाढू शकते असेही सांगण्यात आले आहे. या चालू आर्थिक वर्षातील जानेवारी ते मार्च या कालावधीत देशातील सगळ्यात मोठ्या आठ शहरात घरांचे दर हे वाढलेले दिसून येत आहे. देशातील या आठ शहरात घरांचे दर हे 5 ते 6 टक्क्यांनी वाढल्याचेही पहायला मिळत आहे. तर क्रेडाईनं हे सर्वेक्षण कॉलीअरर्स एॅण्ड फोरास या संस्थेसोबत केले आहे. तर सगळ्यात जास्त वाढ ही दिल्लीतील घरांची झाली असून तेथे आकरा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आणखी दरवाढ होण्याची शक्यता

वाढती महागाई आणि त्यामुळे वाढलेले दर थेट फटका घराच्या स्वप्नाला बसत आहे. महागाई झाल्याने घरासाठी लागण्याऱ्या कच्चा मालांच्या किंमतीत वाढ झाली आहे. याचा परिणाम घरांच्या किंमतीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. तर क्रेडाईने केलेल्या सर्वेक्षणात पुढील सहा ते नऊ महिन्यात पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर ही वाढ किमान पाच ते दहा टक्क्यांनी वाढू शकते असेही सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

देशातील 8 शहरात 5 ते 6 टक्क्यांची वाढ

वाढती महागाईचा फटका फक्त आपल्या राज्यातील जनतेलाच बसत आहे असे नाही. तर देशातील इतर शहारातील लोकांना ही बसत आहे. तर क्रेडाईने केलेल्या सर्वेक्षणात पुढील सहा ते नऊ महिन्यात देशातील मोठ्या आठ शहरात घरांच्या दरात वाढ होईल असे सांगण्यात आले आहे. तर 8 शहरात 5 ते 6 टक्क्यांची वाढ होणार असल्याचे सांगितले आहे.

घरांच्या किमती का वाढणार?

वाढत्या मागणीमुळे कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने सिमेंटच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात सिमेंटच्या किमती मासिक आधारावर दोन ते तीन टक्क्यांनी वाढल्या आहेत. मात्र, वर्षअखेरीस उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सिमेंटच्या उत्पादनालाही गती देण्यात आली, मात्र त्यामुळेही सिमेंटच्या किमतीवर नियंत्रण मिळवता आले नाही.