सोलापूरमध्ये कुणावर आयकर विभागाच्या धाडी ? कोट्यवधी रुपयांचे घबाड कुणी आणि लपवलं ?

| Updated on: Jan 20, 2023 | 10:05 AM

भंगार विक्रेत्यांनी खरेदीची रक्कम कमी दाखवल्याचे देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले असून त्या दृष्टीने अधिकची चौकशी केली जात आहे.

सोलापूरमध्ये कुणावर आयकर विभागाच्या धाडी ? कोट्यवधी रुपयांचे घबाड कुणी आणि लपवलं ?
Image Credit source: Google
Follow us on

सागर सुरवसे, टीव्ही 9 मराठी, सोलापूर : सोमवार ते गुरुवारची सकाळ सोलापूरकरांसाठी खळबळजनक ठरली आहे. आयकर विभागाने सोलपुरमधील व्यावसायिकांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये एकच चर्चा सुरू झाली असून दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. बीफ कंपनी, बांधकाम साहित्य, भंगार विक्रेते, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने या धाडी टाकल्या आहेत. सोलापुरातील आसरा चौक, कुमठा नाका आणि हैदराबाद रोड परिसरामध्ये या धाडी टाकण्यात आल्या आहेत. जवळपास 50 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आल्याने ही चौकशी केली जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोमवार ते गुरुवार या कालावधीमध्ये आयकर विभागाने या धाडी टाकून चौकशी केली आहे. यामध्ये भंगार व्यावसायिक यामध्ये रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भंगार विक्रेत्यांच्या रोखीने झालेल्या व्यवहार आणि कागदोपत्री झालेल्या व्यवहारांमध्ये सुमारे 50 कोटी रुपयांची तफावत आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भंगार विक्रेत्यांनी खरेदीची रक्कम कमी दाखवल्याचे देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले असून त्या दृष्टीने अधिकची चौकशी केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

मुळगाव रोड येथील एका कत्तलखाना चालवणाऱ्या कंपनीवरही छापा टाकण्यात आला असून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापुरातील अनेक कंपन्या आयकर विभागाने रडारवर घेतल्या आहेत.

मुंबई, कोल्हापूरसह विविध कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले असून सोलापुरातील अनेक कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकून चौकशी केल्याने खळबळ उडाली आहे.

शहरात अचानक आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी येणं, छापा टाकणं आणि कागदपत्रांची तपासणी करणे या कारवाईने व्यवसायिकांच्या घरी आणि कार्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.