मुंबई : आज राज्याच्या अर्थ संकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी जाहीर केला आहे. यामध्ये अमृतकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प ( Budget Session ) असल्याने पंचामृत ध्येयांवर हा आधारित आहे. यामध्ये शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा, पर्यावरणपूरक विकास अशी पाच पंचामृते आहेत. त्यानुसार दुसऱ्या पंचामृत मध्ये असलेल्या महिलांच्यासाठी महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महिला दिनाचा संदर्भ देऊन देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करत असतांना महिलांच्यासाठी विविध घोषणा केल्या आहे. यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या ओवीचा देवेंद्र फडणवीस यांनी संदर्भ देऊन जन्मला येणाऱ्या मुलीसाठी मोठी घोषणा केली आहे.
मुलींच्या सक्षमीकरण याकरिता लेक लाडकी ही नवी घोषणा जाहीर केली आहे. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक असलेल्या कुटुंबात मुलगी जन्मला आल्यानंतर या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
मुलगी जन्मला आल्यानंतर तिच्या नावावर सरकार पाच हजार रुपये देणार आहे. तर चौथीत गेल्यानंतर चार हजार रुपये, सहावीत सहा हजार रुपये, अकरवीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
याशिवाय लाभार्थी मुलीचे वय अठरा झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये तिला रोख देण्यात येईल अशी मोठी घोषणा शिंदे – फडणवीस सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.
याशिवाय महिलांच्या दृष्टीने बस मधील मोफत प्रवास हा पन्नास टक्के तिकीट दरात करता येणार असल्याचे जाहीर केले आहे. एकूणच महिलांच्या दृष्टीने अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत दिली जाणार आहे, चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार यामध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर जाहीर करण्यात आले आहे.
याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर, मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना, महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार केला जाणार असल्याचेही जाहीर करण्यात आले असून राज्यात पाच लाखांपर्यंतचे उपचार महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत मोफत केले जाणार आहे.