जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नंदूरबार, नवापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Unseasonal Rain) झाला. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नवापूर तालुक्यातील करंजाळी गावात नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाड जळाल्याची दुर्घटना घडली आहे. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नवापूर तालुक्यात जोरदार वारा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसाला सुरवात झाली. त्याचवेळी करंजाळी गावाजवळ (karanjali village) असलेल्या शेतात नारळाच्या झाडावर वीज पडल्याने नारळाच्या झाडाच्या शेंड्यावर आग लागली होती. नारळाच्या झाडावर वीज पडल्या नंतर झाडाने पेट घेतला.
राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गरज असल्यास घरातून बाहेर पडा असं आवाहन शेतकऱ्यांना हवामान खात्याने केलं आहे. त्याचबरोबर आतापर्यत झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान देखील केलं आहे.
नांदेडमध्ये दुर्मीळ बनलेल्या करडईच्या पेरणी क्षेत्रात यंदा वाढ झालेली दिसतय, अत्यल्प पाण्यावर येणार हे पीक यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना पेरता आलेलं आहे. यंदा राहिलेल्या पोषक हवामानामुळे करडईचे पीक आता फुलोरा अवस्थेत बहरलेल दिसतय. त्यातून कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील केरूर इथल्या शेतकरी जोडप्याने अत्यल्प पाण्यावर आपल्या माळरानावर भाजीपाला फुलवलाय, पारंपारिक पिकातून उत्पन्न होत नसल्याने कबीर कांबळे या शेतकऱ्यांने काकडी आणि दोडक्याची लागवड केली आहे. घेतलेल्या मेहनतीमुळे आता चांगला आर्थिक फायदा होत असल्याचे या शेतकऱ्यांने सांगितलंय. हलक्या प्रतीची जमीन असूनही कांबळे यांच्या मेहनतीने माळरानावर भाजीपाला फुललाय, त्यामुळे अल्प भुधारक शेतकरी असलेल्या कांबळे यांचे कौतुक होतं आहे.