नव्या वर्षाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सर्वत्र नव वर्षाची धामधूम आणि उत्साह दिसून येत आहे. थर्टीफस्ट कसा साजरा करायचा? कुठे करायचा याचं प्लॅनिंग आधीपासूनच अनेकांनी बनवून ठेवलं आहे. मात्र थर्टीफस्ट म्हटलं की पोलिसांसमोरील आव्हानं देखील वाढतात. थर्टीफस्ट सेलिब्रेशनच्या उत्साहाच्या भरात अनेकदा काही गुन्हेगारी घटना देखील घडतात, मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे या काळात अपघातांची संख्या देखील मोठी असते, अशा घटनांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांकडून या काळात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याबाबत जॉइंट कमिश्नर सत्यनारायण चौधरी यांनी माहिती दिली आहे.
मुंबई पोलिसांकडून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तगडा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. त्यासाठी आठ ॲडिशनल सीपी, 30 डीसीपी, 2100 अधिकारी, 12000 पेक्षा जास्त कॉन्स्टेबल आणि या व्यतिरिक्त स्पेशलिस्ट टीम तैनात करण्यात आलेल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची करडी नजर असणार आहे. चौपाटी असतील हॉटेल असेल या ठिकाणी पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे.
एवढचं नव्हे तर 8000 पेक्षा जास्त सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणांवर नजर ठेवण्यात येणार आहे. कोस्टल एरियामध्ये पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. यासाठी 400 पेक्षा जास्त पेट्रोलिंग मोबाईल आणि साडेतीनशे पेक्षा जास्त बीट मार्शल तैनात करण्यात आले आहेत. कोणालाही मदतची गरज लागली तर त्या ठिकाणी आपण तातडीनं मदत पाठवू अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
जेवढे रेकॉर्डवरील आरोपी आहेत, त्यांची चेकिंग सिस्टम आणि त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ही करण्यात येत आहे. पोलिसांसोबतच ट्रॅफिक पोलिसांची तयारी देखील पूर्ण झाली आहे. नागरिकांना कुठे गरज लागली तर त्यांनी पोलिसांशी संर्पक साधावा. थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या हॉटेलसोबत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत. त्यांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्याची माहिती चौधरी यांनी दिली.
गर्दीच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त असणार आहे
जास्त अंधार असेल त्या ठिकाणी बीएमसीला सांगून लाईटची व्यवस्था करण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांना देखील महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने तैनात करण्यात आलेलं आहे. गर्दीच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त असणार आहे, असंही चौधरी यांनी म्हटलं आहे.