भारत देश उद्या 78 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीयांना खूप यातना सोसाव्या लागल्या. भारतीयांनी खूप अत्याचार सहन केले. पण स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या यशस्वी लढ्यामुळे इंग्रजांना आपला देश सोडून जावं लागलं. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वातंत्र्य झाला. भारताला मिळालेलं हे स्वातंत्र्य सोपं नव्हतं. या स्वातंत्र्यांसाठी हजारो नागरिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. अनेक दिग्गज सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी मारली आहे. त्यामुळे खूप संघर्षानंतर हे स्वातंत्र्य भारतीयांच्या नशिबात आलं आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी जास्त महत्त्वाचा आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशाची राजधानी दिल्लीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींच्या हस्ते अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. यामध्ये शाळकरी मुलं, तरुण आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. यावर्षीदेखील राज्यातील 3 वरिष्ठ पोलीस अधिकारी, अग्निशमन दलातील एक अधिकारी, कारावास सेवेतील एक हवालदार यांना पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. तर 17 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पोलीस सेवेतील अतुलनीय शौर्यतेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे.
संतोष वारीक, मुख्य अग्निशमन अधिकारी, महाराष्ट्र
अशोक ओलंबा, हवालदार