निलंबनाच्या कारवाईवर सत्यजित तांबे यांनी अखेर मौन सोडलं, टीव्ही 9 मराठीला दिलेली पहिली प्रतिक्रिया काय ?

| Updated on: Jan 20, 2023 | 1:39 PM

जन्मापासून सत्ता पाहत आलो आहेत, जन्माच्या आधीपासून आमच्या घरात आमदारकी आहे. त्यामुळे सत्ता येत जात राहते पण कॉंग्रेस पक्षाने केलेली कारवाई दुख: देणारी आहे असं सत्यजित तांबे यांनी म्हंटलं आहे.

निलंबनाच्या कारवाईवर सत्यजित तांबे यांनी अखेर मौन सोडलं, टीव्ही 9 मराठीला दिलेली पहिली प्रतिक्रिया काय ?
Image Credit source: Google
Follow us on

कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : कधीकाळी कॉंग्रेसच्या युवा फळीतील अग्रस्थानी असलेले सत्यजित तांबे यांच्यावर कॉंग्रेस पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. सत्यजित तांबे यांनी विधानपरिषदेच्या नाशिक विभागातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावरून कॉंग्रेसची मोठी अडचण निर्माण झाली होती. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आली होती. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार असलेले सुधीर तांबे यांनाच कॉंग्रेसने एबी फॉर्म देऊन उमेदवारी दिली होती. मात्र सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात नाशिकच्या या गोंधळाची चर्चा होऊ लागली आहे. त्यातच भाजपकडे अधिकृत उमेदवारी मागितलेले अनेक उमेदवार असतांना भाजपने कुणालाही उमेदवारी अर्ज न दिल्याने सत्यजित तांबे यांनाच छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने सुधीर तांबे यांच्यासह मुलगा सत्यजित तांबे यांच्यावर पक्षातून निलंबन केल्याचे जाहीर केले आहे.

कॉंग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते असलेले बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले सत्यजित तांबे हे निवडणुकीच्या मैदानात आहे, तर दुसरीकडे थोरात यांचे मेव्हणे असलेले सुधीर तांबे हे विद्यमान आमदार आहेत.

एकूणच काय तर कॉंग्रेस पक्षाने केलेल्या या कारवाईवरुन संपूर्ण राज्यात चर्चा केली जात असतांना सत्यजित तांबे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये सत्यजित तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसने निलंबित करण्याचं दुःख झालं आहे, आमच्या परिवाराला काँग्रेसमध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहे, काँग्रेसने विचारपूस करायला पाहिजे होती अशी खंतही सत्यजित तांबे यांनी बोलून दाखवली आहे.

आम्ही काम करताना कधी जातिवाद केला नाही, आम्ही सर्वांना समान न्याय दिला आहे असेही तांबे म्हणाले आहे, त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने केलेली कारवाई तांबे यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे.

नाशिक मतदारसंघात आमच्या परिवाराचं मोठं ऋणानुबंध आहे, असं सांगत सत्यजित तांबे यांनी सत्ता आम्ही जन्मापासून पाहत आलो आहोत, बालपणातच आम्ही सत्ता पहिली आहे त्यामुळे योग्य वेळी उत्तर देऊ असेही तांबे यांनी म्हंटले आहे.