मुंबई | 02 डिसेंबर 2024 : एखादा संप जेव्हा पुकारला जातो. तेव्हा त्याचा परिणाम केवळ कोणत्या एखाद्या क्षेत्रापुरता मर्यादित नसतो. जेव्हा समाजातील एखादा मोठा घटक संप पुकारतो. तेव्हा त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांवर त्याचा दुरगामी परिणाम होतो. महाराष्ट्रासह देशभरात ट्रक चालकांचा संपावर गेलेत. नवीन मोटारवाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरू आहे. या संपाचे परिणाम तुमच्या आमच्या जीवनावर होत आहे. या संपाचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या खिशावर होणार आहे. देशातील जनतेला महागाईचा सामना करायला लागू शकतो.
देशभरातील ट्रक चालकांनी तीन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. जर हा संप असाच सुरु राहिला तर त्याचा परिणाम वस्तूंच्या किमतीवर होऊ शकतो. मुंबईत दररोज 1.20 लाख ट्रक आणि कंटेनर्स येत असतात. पण हा बंद पुकारण्यात आल्याने आज माल वाहतूक करणारे ट्रक आणि टँकर मुंबईत येऊ शकलेले नाहीत. वस्तूंचा पुरवठा कमी झाल्याने वस्तूंच्या किमती वाढू शकतात. तीन दिवसांच्या या संपामुळे साडे चार कोटींचं नुकसान होऊ शकतं.
एक दिवस ट्रक चालकांनी संप केला तर 120 ते 150 कोटींच्या व्यावसायावर परिणाम होत आहे. तीन दिवसांचा हिशोब केला तर 450 कोटींच्या व्यावसायाला या संपाचा फटका बसू शकतो. याचा सर्वाधिक परिणाम पेट्रोल आणि डिझेलवर होऊ शकतो. तसंच दूथ, फळं , भाज्या यांचा तुटवडा जाणवू शकतो. शिवाय त्याच्या किमतीही वाढू शकतात.
महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी संप पुकारण्यात आला आहे. नवीन मोटारवाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरू आहे. यामुळे निर्माण होणारा तुटवडा लक्षात घेता नागरिकांनी अनेक ठिकाणी पेट्रोलपंपवर गर्दी केली आहे. पुणे, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, रत्नागिरी, मनमाड, अहमदनगर, नाशिक या शहरांमध्ये पेट्रोल पंपवर लोकांनी गर्दी केली आहे. पेट्रोल पंपाच्या बाहेर नागरिकांनी गर्दी केली आहे. पेट्रोल मिळत नसल्याने वाहन चालक व्यथित झाले आहेत. शहरांतील पेट्रोल पंपावर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय.