भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना लैंगिक छळ प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे. अरविंद काळे यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी लैंगिक छळ केल्याची महिला कॉन्स्टेबलने तक्रार केली होती. महिला कॉन्स्टेबलच्या तक्रारीनंतर जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली होती. त्यावरून अरविंद काळे यांच्या आरोपांवर विशाखा समितीच्या वतिने जिल्हा पोलीस आधीक्षकांनी चौकशी केली होती. त्यानुसार अरविंद काळे यांच्याबद्दल करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे समोर आले आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या विशाखा समितीने क्लीन चीट दिली आहे. एकूणच काय तर लैंगिग छळ केल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचा अहवाल विशाखा समितीने सादर केला आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची लैंगिग छळाच्या आरोपातून मुक्तता मिळाली आहे. अरविंद काळे यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा मानला जात आहे.
पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्यावर एका महिला कॉन्स्टेबलने लैंगिग छळाचा आरोप केला होता, त्यावरून विशाखा समितीने तक्रारीची दखल घेतली होती.
महिला कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरुन जिल्हा पोलीस दलाच्या विशाखा समितीने पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार तक्रारीची चौकशी केली होती, त्यात काळे यांच्यावरील आरोपात तथ्य नसल्याचे समोर आले आहे.
विशाखा समीतीने सादर केलेला अहवालात पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना क्लीनचीट देण्यात आली आहे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी हा अहवाल सादर केला आहे.
महिला कॉन्स्टेबलच्या तक्रारीनंतर जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली होती त्यानुसार लैंगिक छळ प्रकरणात तथ्य नसल्याचा विशाखा समितीने अहवाल दिला आहे.
पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना क्लीन चीट मिळाल्याने या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे. असून अरविंद काळे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.