नाशिक : खाद्य पदार्थ बनविण्यात शेफ विष्णु मनोहर ( Chef Vishnu Manohar ) यांच्या नावावर 15 हून अधिक जागतिक विक्रम ( World Record ) आहे. यामध्ये नुकताच त्यांनी नाशिकमध्ये ( Nashik News ) आणखी एक विक्रम केला आहे. शेफ विष्णू मनोहर 4 हजार किलोची भगर शिजवली आहे. हीच भगर खाण्यासाठी नाशिककरांनी तोबा गर्दी केल्याचे नाशिकमध्ये पाहायला मिळाले. नाशिक शहरातील रुग्णालये, आधार आश्रम, सेवा भावी संस्था आणि जवळपास 20 हजर नाशिककरांनीही भगर चाखली आहे. भगर घेण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः रांगा लावल्याचे नाशिकमध्ये पाहायला मिळाले. 2023 हे वर्षे युनेस्कोने मिलेट्स म्हणजेच तृणधान्य वर्षे म्हणून जाहीर केले आहे. त्या धरतीवर भगर हा पदार्थ शिजवण्यात आला आहे.
तृणधान्यामध्ये नाशिक जिल्ह्यात भगर मोठ्या प्रमाणात पिकवली जाते, नाशिकची भगर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय धर्तीवर प्रसिद्ध असलेल्या शेफ विष्णु मनोहर यांच्या उपस्थित चार हजार किलो भगर शिजविण्यात आली आहे.
नाशिक भगर मिल असोसिएशन आणि कृषी विभागाच्या वतिने हे आयोजन करण्यात आले होते. नाशिकच्या ठक्कर इस्टेट येथे चार हजर किलोची भगर शिजवण्याचं आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ती मोफत वाटून देण्यात आली आहे.
जगभरात शेफ विष्णु मनोहर हे प्रसिद्ध आहे. त्यांच्याच उपस्थित ही भगर शिजविण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या नावावर 16 वा विक्रम नाशिकच्या भगर शिजवण्याचा झाला आहे.
या कार्यक्रमाला नाशिकमध्ये शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये विभागीय अधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी, महानगर पालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार उपस्थित होते.
याशिवाय आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, राष्ट्रवादीची शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी स्वतः भगर बनविण्याचा आनंद घेतला.
नाशिक शहरातील नागरिकांनीही हा जागतिक विक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती, यामध्ये नाशिक शहरातील अनेक शालेय विद्यार्थी देखील सहभागी झाले होते, याशिवाय हा विक्रम करत असतांना शेफ विष्णु मनोहर यांची प्रक्रिया पाहण्यासाठी नागरिकांचे अधिक लक्ष होते.
नाशिक शहरात पहिल्यांदाच असा विक्रम झाल्याने नाशिककारणमध्ये उत्साहाचे वातावरण होते, त्यानंतर हा विक्रम पार पडल्यानंतर चार हजार किलोची भगर खाण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होतो. त्यामुळे आगल्या वेगळ्या उपक्रमाची नाशिकमध्ये जोरदार चर्चा होती.