अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर दररोज काही ना काही अपडेट समोर येत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलैला निश्चित झाला आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. याच दरम्यान ईशा अंबानी हिचा एक नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा लूक इटली दरम्यानच्या क्रूझ पार्टीदरम्यान घेण्यात आला होता. ईशा अंबानी हिची ही नवी स्टाइल पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. त्याचा फोटोही सोशल मिडीयावर आला आहे.
ईशा अंबानी क्रूझ पार्टीमध्ये खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे. ईशाने पार्टीसाठी बॉडीकॉनची निवड केली आहे. शियापरेली या ब्रँडचा हा ड्रेस आहे. या ड्रेसमध्ये ऑफ शोल्डर नेकलाइनवर डिझाईन आहे. हा ड्रेस मखमली रंगाचा आहे. तो पूर्णपणे साधा आहे. ईशाने हा ड्रेस लहान हूप्स आणि ब्रेसलेटसह स्टाइल केला आहे. यासोबत तिने ब्लॉक हील्स पेअर केल्या आहेत. तिचा ब्लॅक अँड व्हाइट लूक समोर येत आहे.
ईशा अंबानीला मुलगा कृष्णा आणि मुलगी आदिया अशी दोन जुळी मुले आहेत. मात्र, या फोटोमध्ये तिच्या दोन मुलांऐवजी ईशा दोन खेळण्यातील रोबोटसोबत दिसत आहे. ईशाने एक रोबोट आपल्या मांडीवर घेतला आहे. तर दुसरा रोबोट टेबलावर बसला आहे. हे दोन टॉय रोबोट्स पाहून लोकांना वाटले की ईशाने आपल्या मुलांना नवीन प्रकारचा ड्रेस घातला आहे, पण नंतर कळले की हे टॉय रोबोट आहेत. या टॉय रोबोटची रचनाही शियापरेली ब्रँडने केली आहे. पॅरिस फॅशन वीकमध्ये एका मॉडेलच्या हातात हा रोबोट दिसला होता. जुने फोन, कॅल्क्युलेटर, मायक्रोचिप इत्यादी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली ही फोम बाहुली आहे.