चंपाषष्टीला वांग्याचे भरीत आणि भाकरी का करतात ? याबद्दल तुम्हाला माहितीय का ?

| Updated on: Nov 29, 2022 | 4:02 PM

नवरात्रीप्रमाणे खंडेरायाचा षड्ररात्रोत्सव असतो. जिथे-जिथे खंडोबाचे देवस्थान आहे तिथे-तिथे हा उत्सव पार पडत असतो. आणि नवरात्रप्रमाणेच हा उत्सव खंडोबा भक्त साजरा करत असतात.

चंपाषष्टीला वांग्याचे भरीत आणि भाकरी का करतात ? याबद्दल तुम्हाला माहितीय का ?
Image Credit source: Social Media
Follow us on

नाशिक : वांग्याचे भरीत आणि भाकरी हे तसं महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतील खाद्यपदार्थ. मात्र, वांग्याचे भरीत आणि भाकरी बनविण्यामागे काही खास वैशिष्ट्ये आहेत. विशेषतः चंपाषष्टीला करण्याची प्रथा आहे. याच काळात भरताचे वांगे देखील महागतात. सध्या बाजारात भारताच्या वांग्याला 60 ते 70 रुपये किलो दर आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा म्हणते मार्तंड भैरवाची चंपाषष्टीला मोठी यात्रा असते. पुण्यातील जेजूरीसह महाराष्ट्रातील जिथे-जिथे खंडोबाचे देवस्थान आहे तिथे चंपाषष्टीला खास पुजा-अर्चा आणि यात्रा असते. खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने चंपाषष्टीला घराघरात सुघट आणि तळी भरली जाते. त्याच दरम्यान भरताच्या वांग्याचा आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. आणि तोच प्रसाद म्हणून वाटला जातो. परंतु, यामध्ये काही अख्खायिका सांगितल्या जातात. त्यात खंडोबा वांग्याचे भरीत प्रिय असल्याने त्याचा नैवेद्य केला जातो, आणि तीच प्रथा आजही सुरू आहे.

नवरात्रीप्रमाणे खंडेरायाचा षड्ररात्रोत्सव असतो. जिथे-जिथे खंडोबाचे देवस्थान आहे तिथे-तिथे हा उत्सव पार पडत असतो. आणि नवरात्रप्रमाणेच हा उत्सव खंडोबा भक्त साजरा करत असतात.

षड्ररात्रोत्सव सांगता ही मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला होते आणि त्याला चंपाचष्ठी असं सोप्या भाषेत म्हणत असतात. त्यामुळे मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबाला या दिवशी आवडीचा नैवेद्य केला जातो.

हे सुद्धा वाचा

खंडोबाला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो, ज्यामध्ये सुघट केला जातो, तळी भरली जाते, खंडोबाचे वाहन असलेल्या श्वानालाही नैवेद्य दाखविला जातो.

खंडोबा हे भगवान शंकराचा अवतार असल्याने पिंडीचे पूजन करून पिंडीलाही नैवेद्य दाखविला जातो, भंडारा आणि खोबऱ्याची उधळणही यावेळी केली जाते, प्रसाद म्हणून तो वाटला जातो.

चंपाषष्टीच्या पूर्वीच भरताचे वांगे बाजारात विक्रीला येत असतात, त्यामुळे या काळात भरताच्या वांग्याला चांगला भाव मिळत असतो, सध्या 60 ते 70 रुपये किलोने किरकोळ बाजारात वांग्याचे भरीत मिळत आहे.