मुंबई – रशिया युक्रेनचं (Russia Ukraine) युद्ध सुरू झाल्यापासून इंधन दरवाढ कायम राहिली आहे. मागच्या काही दिवसात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलमधून (Diesel) सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हमालीमध्ये सुध्दा काही दिवसापूर्वी दुप्पट वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वच वस्तूंच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. ही दरवाढ महिनाभरात किराणा सामानासह सर्वच वस्तूमध्ये 12 ते 15 टक्क्यांनी करण्यात येणार आहे अशी माहिती चेंबर ऑफ असोसिएशनस ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅंड ट्रेडचे सचिव मितेश मोदी यांनी सांगितले. मागच्या अनेक दिवसांपासून महागाईत वाढ होत असल्याने सामान्य नागरिक चिंतेत आहेत. दोन वर्ष कोरोना काळात गेल्यानंतर आता कुठेतरी लोकांना बरे दिवस आले होते. परंतु वाढत्या महागाईने लोकांच्या चिंतेत भर घातली आहे.
मुंबईतली अनेक गोदामे पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर आहेत. पूर्वी एक बॉक्स चढ-उतार करण्यासाठी साधारण 10 रूपये आकारले जात होते. परंतु त्याचं कामासाठी आज २३ रूपये आकारले जात आहेत. तसेच वाहतुकीचा खर्च देखील वाढला आहे. अशा परिस्थितीत येणाऱ्या कच्च्या मालासह इतर वस्तूंच्या दरात वाढ करण्याशिवाय व्यापाऱ्यांकडे आता पर्याय उरलेला नाही. दुकानातील कामगारांचे पगार वाढले आहेत. तसेच अनेक कारणांमुळे दरवाढ करण्यात येणार आहे. गव्हाच्या किमतीत किलोमागे 2 ते 3 रूपयाने वाढ करण्यात येणार आहे. बासमती तांदूळ पाच ते दहा रूपयांनी महागणार आहे. बासमती तुकडा 2 रूपयांनी महागणार आहे. तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.
ब्रांडेड मरीन प्लायवूडच्या किमती 10 ते 15 रूपयांनी वाढणार आहे. बी ग्रेड कमर्शियल प्लायच्या किमती 10 ते 13 रूपयांनी महाग होणार आहेत. त्यामुळे घरात वापरणाऱ्या खुर्ची, टेबल, ट्ऱॉली कपाट, दरवाजा, खिडक्या आणि बेड अशा वस्तू 12 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे अशी माहिती फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्रचे संचालक अशिष मेहता यांनी दिली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने वाहतूक खर्चात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. काही दिवसात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात केली आहे.