पिंपरी चिंचवड : अखंड वारकरी सांप्रदाय (Warkari Sampraday) ज्याची आस लावून असतो त्या आषाढी वारीची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली आहे. त्यामुळे वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी तयारीला लागला आहे. ज्याप्रमाणे वारकरी आपल्या आषाढी वारीकडे (Ashadi Wari) आस लावून असतो तसेच अनेकांचे लक्ष हे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथाला (Silver Chariot) कोणाची बैलजोडी ओढणार याकडे ही असते. यासाठी राज्यातून अनेक बैलजोड्यांचे मालक अर्ज हातात घेऊन पांडूरंगाला साद घालताना दिसतात. की आपल्याच बैलजोडी ला रथ ओढण्याचा मान मिळावी. यावर्षीचा हा मान वाकड येथील शेतकरी ज्ञानेश्वर उद्धव शेडगे यांच्या हिरा-राजा आणि धायरी गावातील सागर निवृत्ती टिळेकर यांच्या हिरा-मोती या बैलजोडीस मिळाला आहे. याबाबत संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी रविवारी (ता. 29) माहिती दिली. यावेळी पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे उपस्थित होते.
अखंड वारकरी सांप्रदाय हा पंढरपूरला जाण्यासाठी वारीची वाट पाहत असतो. तसेच वर्षातून दोनवेळी त्याला ही संधी येत असते. त्यातल्या त्यात आषाढी वारीही वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते. तर अनेक बैलजोडी मालकांना आपल्या प्रिय जोडीला आषाढी वारीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथ ओढण्याचा मान मिळावा. त्या रथाला आपली बैलजोडी जुंपण्याचा मान मिळावा म्हणून प्रयत्न करत असतात. यावेळी ही देहूस्थांनकडे 17 अर्ज प्राप्त झाले होते. ज्यातून ज्ञानेश्वर शेडगे, यांच्या बैलजोडीला रथ ओढण्याचा मान मिळाला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह वाकडकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
ज्ञानेश्वर शेगडे हे वारकरी संप्रदायातील असून गेल्या काही वर्षांपासून पालखी रथ ओढण्याचा मान मिळावा म्हणून ते प्रयत्नशील होते. अखेर त्यांच्या बैलांना पालखी रथ ओढण्याचा मान मिळाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्याकडे नऊ बैल असून पैकी हिरा- राजा आहेत, नुकताच त्यांच्या एका बैलाचा मृत्यू झाल्याने ज्ञानेश्वर शेडगे यांना बोलताना अश्रू अनावर झाले होते. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 20 जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 20 जूनला देहूतून पंढरपूरकडे जाणार आहे. त्यामुळे यावेळेआधी रथ ओढण्यासाठी संस्थान विश्वस्त मंडळाकडून बैलजोडीची पाहणी केली जाते. विशेष म्हणजे मंडळाकडून बैलजोडीची पाहणी ही शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी केली जाते. यावेळी ही देहूस्थांनकडे 17 अर्ज प्राप्त झाले होते. ज्याची पाहणी करण्यात आली. ती बैलाचा रुबाबदारपणा, त्यांचा रंग व इतर गुणांवर आधारीत असते. त्यानुसार 17 पैकी दोन शेतकऱ्यांच्या बैलजोडी निवडल्या. संस्थानने देऊळवाड्यात रविवारी अंतिम दोन बैलजोडीची सर्वानुमते निवड केली. यात शेडगे आणि टिळेकर यांच्या बैलजोडीस मान मिळाला.