माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांना सुनावलं आहे. काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्रिपदाचे 10 उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेसला 288 जागा लढवल्याशिवाय पर्याय नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेसला एकटे पाडतील, अशी काँग्रेसला भीती आहे. त्यामुळे काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असं मंत्री अनिल पाटील म्हणाले होते. त्याला पृथ्वीराज चव्हाणांनी उत्तर दिलं आहे. आमच्यात आपसमध्ये भांडणं लावण्याचं काम आणि प्रयत्न कुणी करू नये, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
आम्ही तिन्ही पक्ष सर्व नॉन पॉलिटिकल संघटनांना एकत्र येऊन पुन्हा ताकदीने विधानसभा निवडणूक लढणार आहेत. महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यायचा असेल तर हे अन्यायकारक आणि भ्रष्ट सरकार लवकरात लवकर घालवले पाहिजे, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रत्येक मतदार संघात आम्हाला ताकद वाढव्याची आहे. याशिवाय मी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत कशी करणार? आम्हाला महविकस आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करायचं आहे. ज्या पद्धतीने आम्ही लोकसभा लढलो..त्याच पद्धतीने आम्ही सर्व एकत्र विधानसभा निवडणूक लढणार आहोत, असं म्हणत आगामी निवडणुकीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असं काही नाही. लोकसभेच्या निकालाने कोणीही हुरळून जावू नये. अशी माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे. आम्ही सर्व ताकदीने निवडणूक लढणार आहोत. छोटे पक्षांसोबत घेवून त्यांना सुद्धा आम्ही जागा देणार आहोत. आजूनही जागा वाटपाची बैठक झालेली नाही. आधी कुणी काही विधानं करू नयेत, असंही ते म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. आमची प्रामाणिक इच्छा आहे की सोडायला या लवकरात लवकर झाल्या पाहिजेत. त्या दोन्ही पक्षांना न्याय मिळाला पाहिजे. पूर्वी जो निर्णय झालेला आहे तो आम्हाला मान्य नाही तो अन्यायकारक आहे. नवीन सुनावणीतून उद्वव ठाकरे आणि शरद पवार या दोघांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, अंस पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.