Viral News : दारूच्या नशेत तराट होऊन रूळावर झोपला, अंगावरून गेले रेल्वेचे तीन डबे अन् त्यानंतर…पाहा काय घडलं?

| Updated on: Aug 31, 2023 | 1:21 PM

Jalgaon Viral News : एक जण दारू पिऊन फुल तराट झालेल्या तरूणाच्या अंगावरून रेल्वेचे तीन डबे गेले तरीही त्याला अजिबात कुठेही खरचटलंसुद्धा नाही. जळगावमधील धरणगाव तालुक्यातील पाळधी इथे ही घटना घडली.

Viral News : दारूच्या नशेत तराट होऊन रूळावर झोपला, अंगावरून गेले रेल्वेचे तीन डबे अन् त्यानंतर...पाहा काय घडलं?
Follow us on

जळगाव : सोशल मीडियावर रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. यामधील अनेक व्हिडीओ असे असतात की त्यावर विशवास बसत नाही. काही व्हिडीओमध्ये असे नशेडी असतात की त्यांची अवस्था पाहू हसू आवरत नाही. असाच एक जण दारू पिऊन फुल तराट झालेल्या तरूणाच्या अंगावरून रेल्वेचे तीन डबे गेले तरीही त्याला अजिबात कुठेही खरचटलंसुद्धा नाही. जळगावमधील धरणगाव तालुक्यातील पाळधी इथे ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

एकलग्न या गावामधील तरूण मच्छिंद्र गायकवाड याने नशा केली होती. नशेमध्ये असलेला मच्छिंद्र मंगळवारी दुपारी पाळधी सोनवद रेल्वे गटमध्ये आत्महत्या करण्यासाठी गेलेला. त्यावेळी तिथे असलेल्या गेटमनने त्याला तिथून हटकवलं. मात्र तो तिथून काही गेला नाही, त्यावेळी तिथून एक ट्रेन गेली तेव्हा गेटमनमुळे त्याचे प्राण वाचले. मात्र काही वेळाने तो परत आला आणि रूळाच्या मध्यभागी झोपला.

तो तरूण झोपल्यावर काही वेळाने त्याच्यावरून मालगाडी गेली. मालगाडीचे तीन डबे त्याच्यावरून गेले होते. गेटमन आला आणि गाडी थांबवून त्या तरूणाला पाहिलं तर तो जिवंत होता. त्याला कसलीही दुखापत झाली नव्हती. मग रूळावरून त्याला उलचून घेत बाजूला दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आलं.

रेल्वे गेटमनने त्याला आधीच हटकवलं नसतं तर त्याचा जीव गेला असता. सुनील आर असं त्या गेटमनचं नाव असून त्याच्या सतर्कतेमुळे मच्छिंद्र गायकवाड याचा जीव वाचला. नाहीतरल नशेच्या नादाता त्याला आपला जीव गमवावा लागला असता.

दरम्यान, दरम्यान, मच्छिंद्र गायकवाड याचं नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला. एखाद्या देवदूतासारखा रेल्वे गेटमन त्या ठिकाणी पोहोचला. या घटनेची चर्चा पंचकृषीमध्ये होत आहे.