जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली पीकं अवकाळी पावसात सापडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच अवकाळी पावसानंतर होणाऱ्या पंचनाम्यांचे काय असा सवाल शेतकरी करत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारवर टीका केली. एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना लक्ष्य केले आहे.
अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही ना सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत आहे ना जिल्ह्याचे पालकमंत्री अथवा नेते त्याकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे झालेली नुकसान भरपाई देणार का असा सवालही आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मात्र या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम वाया गेल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीतून फायदा काय मिळणार असा सवाल शेतकरी करत आहेत.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तरी सरकारकडून अजून कोणतीच घोषणाही करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरीही नुकसान भरपाईचे पंचनामे होणार की नाही असा सवाल करत आहेत.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची वाईट अवस्था असल्यामुळे आमदार एकनाथ खडसे यांनी सत्ताधारी पक्षातील गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अवकाळी पावसात सगळं पीक फस्त झाले आहे तरीही पालकमंत्री अन्य कामांमध्ये व्यस्त असल्याची टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊनही मंत्र्यांचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही नुकसानीबाबत पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालण्याची याकडे आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी नाव न घेता गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.