जळगाव : घरामध्ये झोका खेळताना झोका (Swing) पडून भिंतीच्या विटा अंगावर पडल्याने दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू (Death) झाला तर दोन बालिका गंभीर जखमी (Injured) झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील सावदे येथे शनिवारी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली आहे. जखमी बालिकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अर्चना पावरा असे मयत बालिकेचे नाव आहे. मयत आणि जखमी तिन्ही मुली सख्ख्या बहिणी आहेत. मयत बालिकेवर सायंकाळी सावदे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने सावदे गावावर शोककळा पसरली आहे.
सावदे गावात धनसिंग शीला पावरा हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. धनसिंग हे गेल्या 15 वर्षांपासून गावातील शेतकऱ्यांची शेती बटाईने करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी धनसिंग व त्यांची पत्नी हे शेतात गेले तर धनसिंगची आई व त्याच्या तीन चिमुकल्या मुलीच घरी होत्या. कच्च्या विटांच्या घरावर लोखंडी पाईपाला साडीद्वारे केलेल्या झोक्यात तीनही मुली खेळत होत्या. खेळत खेळता अचानक साडीचा झोका तुटला. तसेच भिंतीच्या वीटा अंगावर पडल्या. या घटनेत अर्चना पावरा ही दीड वर्षाच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्या साडे तीन वर्षे व पाच वर्ष वयाच्या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या. गंभीर जखमी दोघी बहिणींवर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत अर्चना हिच्यावर सायंकाळी सावदे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (A one and a half year old girl died due to swing broken in Jalgaon)