शरद पवारांच्या टीकेला अजित पवार गटातील मंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, जनतेच्या कृपादृष्टीने…

| Updated on: Jun 15, 2024 | 6:41 PM

Anil Patil on Sharad Pawar Statement : आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. शरद पवारांच्या टीकेला अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. मंत्री अनिल पाटील काय म्हणाले? वाचा सविस्तर...

शरद पवारांच्या टीकेला अजित पवार गटातील मंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, जनतेच्या कृपादृष्टीने...
शरद पवार, अजित पवार
Follow us on

आमच्या जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेतल्यामुळे भाजपवर लढण्याची वेळ आली, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यावर मंत्री अनिल पाटील यांनी उत्तर दिलं आहे. पुढचे पाच वर्षासाठी एनडीएचे सरकार स्थापन झालेला आहे.. आता पाच वर्ष एनडीए आघाडीच्या नेत्यांना बोलण्या व्यतिरिक्त महाविकास आघाडी किंवा इंडिया गाडीचे नेत्यांकडे कुठलाच पर्याय उरलेला नाही. आता तरी हे सरकार जनतेच्या आशीर्वादाने आलेलं आहे. जनतेच्या कृपादृष्टीने एनडीए सरकार आलं आहे. त्यामुळे आता वाट बघणे आणि सरकार कधी पडतं या वल्गना करणं. एवढंच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हातात उरलेलं आहे, असं मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.

महायुतीच्या नेत्यांना प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्याने निवडणुकीत घेतलेल्या मेहनतीचा समाधान आहे. त्यामुळे महायुतीतील कुठल्याही घटक पक्षावर या वाक्याचा परिणाम होणार नाही, असंही पाटील म्हणाले. आमचा स्ट्राइक रेट चांगला आहे. त्यामुळे आम्ही मोठा भाऊ असल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि शंभूराज देसाई यांनी केला आहे. त्यालाही अनिल पाटलांनी उत्तर दिलंय.

महायुतीत मोठा भाऊ- छोटा भाऊ कोण?

महायुतीमध्ये कोण मोठा भाऊ आणि कोण छोटा भाऊ असा कुठलाही विषय राहिलेला नाही. इथे सगळेच मोठे भाऊ आणि सगळ्यात छोटे भाऊ आहेत. महायुतीतील घटक पक्ष एकत्रित ठेवणं. पक्ष संघटन करणे महायुती संघटित ठेवणं, यासाठी कोणाला कोणाला मोठ्या भावाची आणि कुणाला तरी छोट्या भावाची भूमिका ही निभवावी लागणार आहे. मोठा भाऊ कधीतरी त्यागही करू शकतो. लहान भावाला कधीतरी जास्त हिस्सा ही द्यावा लागतो. असेही प्रसंग आपल्याला जीवनात बघायला मिळतातराजकीय क्षेत्रात काम करताना मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असं काही नसतं.. समसमान सर्वांना प्रत्येकाला अधिकार असतो, असंही अनिल पाटलांनी म्हटलं आहे.

सुनेत्रा पवार मंत्री होणार?

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे त्या आता केंद्रात मंत्री होतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. यावर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवले आहे. त्यांनी मत मांडला हे संधी मिळाली तर ते नक्कीच चांगलं काम करू शकतील. पण कुणाला मंत्री बनवायचं आणि कोणाला मंत्री बनवायचं नाही. याचे सर्व अधिकार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांचा आहे. सुनेत्रा पवार या कॅपेबल जरी असल्या तरी पक्षश्रेष्ठीचे ठरवतील तेच घडेल, असं अनिल पाटील म्हणाले.