अजित पवार जर महाविकास आघाडीसोबत राहिले असते, तर ते मुख्यमंत्री झाले असते. अजितदादा महायुतीत गेले म्हणून ते मुख्यमंत्री झाले नाहीत, असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल बोलताना म्हणाले. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. काकीला मिशा असल्या असता तर काय झालं असतं हे असं झालं आता… असं विषय काही होऊ शकत नाही, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
महिलांनी मत कमी दिली म्हणून महिलांसाठी ‘लाडकी बहिण योजना’ आणली, असं फेक निगेटिव्ह विरोधक सेट करत आहेत. लोकसभेत देखील विरोधकांनी खोटे निगेटिव्ह सेट करण्यात यश मिळालं मात्र आता तसं होणार नाही. आता सगळ्यांनी कान डोळे उघडे ठेवले आहेत… त्यामुळे विरोधकांच्या भुल थापणा जनता बळी पडणार नाही , यावेळचा निर्णय तुम्हाला वेगळा लागलेला दिसेल, असं गिरीश महाजन म्हणाले.
25 तारखेला पुन्हा जळगावला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत असून त्यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम जळगावमध्ये होईल. महायुतीचा एक एकच पक्षाचा उमेदवार या वेळेला सर्व ठिकाणी राहील. तिकीट मागण्याचा अधिकार हा सर्वांना आहे मात्र एकदाच उमेदवार जाहीर झाले की त्यानंतर आमच कोणीही बंडखोरी करणार नाही, असंही गिरीश महाजनांनी म्हटलं आहे.