“संजय राऊत यांनी स्वतःची लायकी पाहावी”; भाजप नेत्याने या प्रकरणावरून राऊतांची लायकी काढली

| Updated on: Apr 22, 2023 | 8:34 PM

संजय राऊतांनी स्वत:ची लायकी पाहावी, कारण लोकांमध्ये जाऊन त्यांनी निवडून येऊन दाखवावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार ते पाच वेळा लोकांमधून निवडून आलेलं आहेत.

संजय राऊत यांनी स्वतःची लायकी पाहावी; भाजप नेत्याने या प्रकरणावरून राऊतांची लायकी काढली
Follow us on

जळगाव : महाविकास आघाडीची जळगावमधील पाचोरामध्ये उद्या सभा होत आहे. मात्र त्याआधीच जळगावमधील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.ठाकरे गट आणि शिवसेना आक्रमक होत असतानाच त्यामध्ये आता मनसेही उडी घेतली आहे. खासदार संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर मनसैनिकांनी आता त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे आता भाजपनेही संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून त्यांना घेरले आहे. भाजपचे मंत्री आणि नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावरील बोलण्यावरून त्यांच्यावर आता सडकून टीका केली जात आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यापासून खासदार संजय राऊत यांच्याकडून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांवर सडकून टीका केली जाते.

त्यांच्या त्या टीकेवरूनच शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांकडूनही जोरदार त्यांच्या टीका केली जाते. तर आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीची जळगामध्ये सभा होत आहे.

त्यावरूनच आता शिवसेनेच्या आणि मनसेच्या नेत्यांनी खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली तर सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.

तर त्यानंतर आता भाजपचे मंत्री गिरिश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी कुठेही सभा घ्यावी. मात्र त्यांच्या या सभेचा कोणताही परिणाम होणार नाही म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेला कमी लेखले आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. त्यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, संजय राऊतांनी स्वत:ची लायकी पाहावी, कारण लोकांमध्ये जाऊन त्यांनी निवडून येऊन दाखवावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार ते पाच वेळा लोकांमधून निवडून आलेलं आहेत.

त्याच प्रमाणे एकनाथ शिंदे ठाण्यातून निवडणूक जिंकतात असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. त्याच प्रमाणे एकनाथ शिंदे ठाणे महापालिका निवडणुकही लढवू शकतात. असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.