उद्धव ठाकरे यांच्या सभेत घुसून दाखवा, तर गुलाबराव पाटील यांना ५१ हजारांचं बक्षीस

| Updated on: Apr 21, 2023 | 7:35 PM

गुलाबराव तुम्ही सभेत घुसून दाखवा, असं आव्हान त्यांना देण्यात आलं. त्यानंतर गुलाबराव पाटील म्हणाले, माझे शिवसैनिक सभेत घुसतील.

उद्धव ठाकरे यांच्या सभेत घुसून दाखवा, तर गुलाबराव पाटील यांना ५१ हजारांचं बक्षीस
Follow us on

जळगाव : गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी काल एक वादग्रस्त व्यक्त केलं. गुलाबराव पाटील म्हणाले, संजय राऊत हे माझ्याविरोधात काही बोलले तर मी उद्धव ठाकरे यांच्या पाचोऱ्याला असलेल्या सभेत घुसून दाखवेन. या जिल्ह्याची जबाबदारी ही गुलाबराव पाटील यांच्यावर आहे. कायदा, सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशावेळी गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे गट आक्रमक झालाय. गुलाबराव तुम्ही सभेत घुसून दाखवा, असं आव्हान त्यांना देण्यात आलं. त्यानंतर गुलाबराव पाटील म्हणाले, माझे शिवसैनिक सभेत घुसतील.

त्यानंतर ठाकरे गट पुन्हा आक्रमक झाला. ठाकरे गटाने आंदोलन केले. गुलाबराव पाटील यांनी सभेत घुसून दाखवावं, यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांच्या सभेत घुसून दाखवा आणि ५१ हजार रुपयांचं बक्षीस घेऊन जा, असा धनादेश या आंदोलनात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दाखवला. गुलाबराव पाटील यांच्या नावाने हा धनादेश लिहण्यात आला.

हे सुद्धा वाचा

हिंमत असेल तर सभेत घुसून दाखवावे

सभेत घुसून दाखवण्याची भाषा हे गुलाबराव पाटील बोलून दाखवतात. त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी सभेत घुसून दाखवावं. ते परत कसे जातील हे शिवसैनिक पाहतील, असा इशारा ठाकरे गटाचे कार्यकर्ता गजानन मालपुरे यांनी दिला.

किती मर्दुमकी आहे

गद्दार ठाकरे यांची शिवसेना सोडून गेले आहेत. खरे शिवसैनिक जागच्या जागी आहेत. शिवसैनिकांना गुलाबराव पाटील यांनी शहाणपण शिकवू नये. गुलाबराव पाटील यांच्या किती मर्दुमकी आहे, हे आम्हाला माहिती असल्याचंही गजानन मालपुरे म्हणाले.

सभेत घुसा ५१ हजार घेऊन जा

गुलाबराव पाटील यांनी आतापर्यंत शिवसैनिकांचा बळी दिलेला आहे. ते कधीच लढायला गेले नाहीत. गुलाबराव पाटील हे सभेत आले तर मी त्यांनी रोख ५१ हजार रुपये देईन. असंही गजानन मालपुरे यांनी म्हंटलं.

पाचोऱ्यातील सभेत घुसून दाखवा. आम्ही गुलाबराव पाटील यांनी ५१ हजार रुपये देऊ. असं आव्हान ठाकरे गटाचे जळगाव जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांनी दिलं. आता हे आव्हान गुलाबराव पाटील स्वीकारतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.