जळगाव : मध्यप्रदेश महाराष्ट्र (Khandesh-Madhya Pradesh) आरटीओ चेक पोस्टवर वाहनधारकांकडून हजारो रुपयाची वसुली केल्या जात असल्याची माहिती एकनाथ खडसेंना मिळाली. एकनाथ खडसेंनी या ठिकाणी तात्काळ भेट देऊन अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. होत असलेल्या चेक नाक्यावरील प्रकाराबाबत खडसे विधान परिषदेत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आरटीओ (RTO) चेक पोस्ट (Check Post) नाक्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
चेक पोस्ट हा आरटीओ कर्मचाऱ्यांसाठी दोन नंबरच्या कमाईचे साधन आहे. वाहनचालकांकडून या ठिकाणी वसुली केली जाते. मध्यप्रदेश महाराष्ट्र आरटीओ चेकपोस्ट तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारी वाहनं असतात. अशावेळी त्यांच्याकड एकादा कागदपत्र कमी असला, तर त्यांच्याकडून वसुली केली जाते. ही बाब एकनाथ खडसे यांना सांगण्यात आली. खडसे हे लगेच चेकपोस्टवर गेले. त्याठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले.
काही अधिकारी अतिशय निर्लज्ज असतात. ते काही कोणाला जुमानत नाही. अशावेळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केल्यास संबंधित मंत्र्यांना प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. मंत्री संबंधित विभागाच्या सचिवाकडून अहवाल मागवितात. त्यानंतर ते उत्तरं देतात. अशावेळी एखाद्या अधिकाऱ्याची चूक असेल, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळं अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, असा प्रयत्न आमदारांचा असतो.
या नाक्याची चौकशी ही वरिष्ठ पातळीवर झाली पाहिजे. याठिकाणी किती वसुली केली जाते. त्याचा वाटा कुणाकुणाला मिळतो. यावर वचक कसा बसविता येईल. यासाठी आता एकनाथ खडसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.