सुवर्णनगरी जळगावमध्ये सोने आणि चांदीच्या दरवाढीच कहर झाला. खरेदीसाठी आलेले ग्राहक या भाववाढीपुढे हतबल दिसले. त्यातील अनेकांनी खरेदीचा बेत रद्द केला. तर काहींना कमी सोन्यात खरेदीचा आनंद मानावा लागला. जागतिक स्तरावर सोने आणि चांदीच्या किंमती भडकले, त्याचा परिणाम बाजारपेठेत दिसून येत आहे. मौल्यवान धातूच्या किंमती आता जीएसटीसह सामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत. अनेकांच्या खेरदीच्या उत्साहावर पाणी फेरले तर अनेक जण हिरमसून बाजाराबाहेर पडले.
सर्वकालीन उच्चांकी भाव
सुवर्णनगरी जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीचे आजपर्यंतचे सर्वाधिक विक्रमी भाव पाहायला मिळाला.जळगावच्या बाजारात सोन्याच्या भावात एक हजाराने तर चांदीच्या दरात प्रती किलोमागे 3 हजार रुपयांनी भाव वाढ दिसली. सोन्याने 75 हजारांचा आकडा पार तर चांदी सुद्धा 90 हजारांचा टप्पा ओलांडून विक्रमी दरावर पोहचली. सोन्याचा भाव जीएसटीसह 76 हजार 200 तर चांदीचे भाव प्रति किलो 91 हजारांवर पोहचला. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात सोने आणि चांदीचे आजपर्यंचे सर्वात विक्रमी भाव ठरला आहे.
दरवाढ कशामुळे
जागतिक बँकांचे व्याजदर कमी झाले आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वळवला आहे. तर चीनमध्ये सोने आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाली आहे. अनेक देशाच्या मध्यवर्ती, केंद्रीय बँक सोन्याचा साठा करुन ठेवत आहेत. या सर्व कारणांमुळे सोन्यामध्ये सातत्याने भाव वाढ होत असल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी दिली आहे. या दरवाढीने गुंतवणूकदारांचा फायदा झाला आहे. तर खरेदीदारांचा मोठा हिरमोड झाला आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी घसरली. 24 कॅरेट सोने 73,383 रुपये, 23 कॅरेट 73,089 रुपये, 22 कॅरेट सोने 67,219 रुपये झाले. 18 कॅरेट 55,037 रुपये, 14 कॅरेट सोने 42,929 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 86,373 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.