‘तेरा पैलवान मेरे सामने उतार दे’, शिंदे गटाची मुलूख मैदान तोफ धडाडली, या बड्या नेत्याचे संजय राऊत यांना ओपन चॅलेंज

| Updated on: Sep 22, 2024 | 12:28 PM

Udhav Thackeray -Sanjay Raut : राज्यात निवडणुकीपूर्वी राजकीय नेत्यांच्या भाषणांनी रंगत चढली आहे. खुसखुशीत आणि जहरी शब्दांनी एकमेकांवर आसूड ओढण्यात येत आहे. विधानसभेपूर्वी राजकीय सभांची संख्या वाढली आहे. आता शिंदे गटातील या बड्या नेत्याने 'तेरा पैलवान मेरे सामने उतार दे',असे आव्हान दिले आहे.

तेरा पैलवान मेरे सामने उतार दे, शिंदे गटाची मुलूख मैदान तोफ धडाडली, या बड्या नेत्याचे संजय राऊत यांना ओपन चॅलेंज
उद्धव ठाकरे यांना माझ्याविरोधात लढवा
Follow us on

राजकीय पक्षांना निवडणुकीचा ज्वर चढला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय फैऱ्या झडत आहे. गौफ्यस्फोटाने रणधुमाळीला रंग चढला आहे. तर शाब्दिक युद्धाने राजकीय आखाड्यात दोन्ही बाजूंनी शड्डू ठोकण्यात आले आहे. खुसखुशीत आणि जहरी शब्दांनी एकमेकांवर आसूड ओढण्यात येत आहे. विधानसभेपूर्वी राजकीय सभांची संख्या वाढली आहे. आता शिंदे गटातील या बड्या नेत्याने ‘तेरा पैलवान मेरे सामने उतार दे’,असे आव्हान दिले आहे.

उद्धव ठाकरे यांना माझ्याविरोधात लढवा

40 रेडे फुटून गेले म्हणणारा माणूस संजय राऊत याला माझे चॅलेंज आहे. तेरा पैलवान मेरे सामने उतार दे, असे आव्हान मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे यांनाच आपल्या समोर मैदानात उतरवा असे आव्हान त्यांनी केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेतील दोन्ही गोटात धुमश्चक्री उडणार हे पक्कं आहे.

हे सुद्धा वाचा

जळगाव येथील धरणगावच्या सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत उद्धव ठाकरे गटाचा चांगलाचा समाचार घेतला. सुषमा अंधारे बोलून गेल्या होत्या की या रेड्याला आम्ही कापणार आहोत तो रेडा आता तयार आहे.तुझ्याकडे कापण्याला कोणी माणूस तलवार घेऊन उभा आहे का याची तलाश हा गुलाबराव पाटील करतो आहे, असा उपरोधिक टोला सुद्धा त्यांनी यावेळी लगावला.

आम्ही उठाव केला नसता तर…

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा जर मी उठाव केला नसता, तर या दोन वर्षाची कोट्यवधी रुपयांची कामे झाली, ती झाली नसती हे तुम्हाला मान्य करावे लागेल. तुम्ही बोलले होते ना ज्या चाळीस ठिकाणी कुठून गेलेले लोक उभे आहेत. त्या 40 ठिकाणी आम्ही शिवसैनिक उभे करू तर किधर है तेरा शिवसैनिक.संजय राऊत, असा चिमटा त्यांनी काढला.

हे सर्व पळपुटे

कोण आमच्यासमोर उभा राहिला तयार आहे हे सर्व पळपुटे आहेत. यांना या ठिकाणी आयात केलेला उमेदवार आणावा लागेल दत्तक पुत्र निश्चित करावा लागेल. हीच आमची या ठिकाणी विजयाची पहिली नमुना आहे. मेरे जिस्म – और – जान में बालासाहब का नाम है ! आज अगर मै यहा हुं, तो एहसान शिवसेनेका है !!, असा शेर पण त्यांनी पेश केला. बाळासाहेबांचे सर्व विचार सोडून उद्धव साहेब तुम्ही सर्व गहाण ठेवला आहे. गुलाबराव पाटलाकडे पैसा नसेल तर गुलाबराव पाटलाकडे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते थकते नही है, बिकते नही, और किसीके सामने झुकते नही, असा टोला त्यांनी लगावला.

जनतेला केले मोठे आवाहन

विरोधी उमेदवार कोण यापेक्षा धनुष्यबाण डोळ्यासमोर ठेवा. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख आणि दु:खात मी आणि माझा परिवार आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. संपर्क कधीही कमी पडू दिला नाही. आता तुमची साथ हवी आहे. सर्वसामन्य कार्यकर्त्यांची खंबीर साथ हीच माझी श्रीमंती आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते हे थकणारे , विकणारे व झुकणारे नसून लढणारे असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. मी जर पडलो तर माझ्या घरासमोर नाही तुमच्या घरासमोर फटाके फुटतील, असा चिमटा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना घेतला.

शरद पवारांवर टीका करण्याऐवढी मी मोठा नाही

शरद पवार यांच्यावर टीका करू नका. कारण आपली तेवढी लायकी नाही. शरद पवार यांच्यावर टीका करणे एवढा मोठा माणूस मी झालेला नाही. संजय राऊत, वो अपना माल है. उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर मी कधीच टीका करत नाही कारण टीका करण्याएवढी आपली लायकी नाही. कार्यकर्त्यांनी मर्यादा ओळखून व जपून बोलण्याचाही सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला