सुवर्णनगरीने दिली ग्राहकांना आनंदवार्ता, सोने 1300 तर चांदी पण झाली स्वस्त

| Updated on: Dec 06, 2023 | 10:40 AM

Jalgaon Gold | जळगावच्या सुवर्ण नगरीत एकाच दिवसात सोन्याच्या दरात 1300 रुपयांनी घसरण झाली. चांदीचा भावदेखील दोन हजारांनी घसरला. सोन्याचे दर 63 हजार रुपये प्रति तोळ्यावर तर चांदी 76 हजार रुपये प्रति तोळ्यावर आली आहे. लग्न सराईत भाव घसरल्याने ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली आहे. दिवाळीपासून दरवाढीने ग्राहकांचा हिरमोड झाला होता.

सुवर्णनगरीने दिली ग्राहकांना आनंदवार्ता, सोने 1300 तर चांदी पण झाली स्वस्त
Follow us on

किशोर पाटील, जळगाव | 6 डिसेंबर 2023 : सोने आणि चांदीने गेल्या आठवड्यापासून दरवाढीचे अनेक रेकॉर्ड केले आणि अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. ऐन लग्नसराईत सोने-चांदीतील ही दरवाढ ग्राहकांच्या उत्साहावर पाणी फेरणारी ठरली. जळगावच्या सुवर्णनगरीत पण सोने-चांदीचे दाम गगनाला भिडले होते. पण सोन्याच्या दरात मंगळवारी एकाच दिवसात एक हजार 300 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने 63 हजार रुपये प्रति तोळ्यावर आले. चांदीच्या भावात ही दोन हजार रुपयांची घसरण होऊन ती 76 हजार रुपये प्रति तोळ्यावर आली आहे. लग्न सराई असल्याने ग्राहकांना सोने चांदीचे दर कमी झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

सोमवारी भाव गगनाला

गेल्या आठवड्यापासून सोने चांदीचे भाव सतत वाढत आहे. सोमवारी सोने 64 हजार 300 रुपये प्रति तोळ्यावर तर चांदी 78 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव वाढल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सट्टा बाजारात अचानक सोने-चांदी विक्रीला काढण्यात आले. त्यामुळे त्यांचे भाव कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.या परिणामामुळे मंगळवारी सोन्याच्या भावात 1300 रुपयांची तर चांदीत दोन हजार रुपयांची घसरण झाली.

हे सुद्धा वाचा

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), काल 24 कॅरेट सोने 62,287 रुपये, 23 कॅरेट 62,038 रुपये, 22 कॅरेट सोने 57,055 रुपये झाले. 18 कॅरेट 46,715 रुपये, 14 कॅरेट सोने 36,438 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,383 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.