राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. सगळेच राजकीय पक्ष या निवडणुकीत कामाला लागलेत. अशातच अनेक नेत्यांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केलीय. भाजप उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार आहे. उद्या भाजपची पहिली यादी येणार आहे. अशातच जळगाव शहराचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांनी टीव्ही 9 मराठीश बोलताना उमेदवारीची मागणी केलीय. माझ्या हातात आणि मनात आणि डोक्यात कमळं आहे. जळगाव शहरातून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळेल, असा विश्वास विद्यमान भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केला आहे.
भाजपची उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. यात जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का? यावर चे आमदार सुरेश भोळे यांनी प्रतिक्रिया दिली. जळगाव शहरातून तिसऱ्यादा उमेदवारी मिळेल. कार्यकर्ता म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्हाला शंभर टक्के न्याय मिळेल, असं भोळे म्हणालेत. माझ्या हातात आणि मनात आणि डोक्यात कमळं आहे. त्यामुळे पक्षाचे आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे पक्षाने सांगितलं थांब तर मी 100% थांबणार आहे, असंही ते म्हणालेत.
मी 25 ते 30 वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षश्रेष्ठीचे नेतृत्वाचे जे आदेश असतील ते मानणारा मी कार्यकर्ता आहे. 25- 30 वर्षांपासून काम करत असताना जनतेची सेवा करतोय. त्यातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा जनतेची सेव, हाच प्रयत्न मी केलेला आहे. पक्ष काम करणाऱ्याला संधी देत असतो, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा संधी तसेच उमेदवारी मिळेल याची खात्री आहे. कार्यकर्ता म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्हाला शंभर टक्के न्याय मिळेल, असं सुरेश भोळे म्हणालेत.
जळगाव जिल्ह्यात पक्षांतर्गत नाराजी पाहायला मिळतेय. पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरी केली जात आहे. यावरही सुरेश भोळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्याने मागणं आणि इच्छा ठेवणं यात काही गैर नाही. त्यानुसार प्रत्येक कार्यकर्त्याला मागण्याचा अधिकार आहे. पक्षाने मला जर उद्या थांब सांगितलं तर मी थांबेल आणि पक्ष जो निर्णय घेईल. त्यानुसार त्या उमेदवाराचा मी काम करेल. पक्ष सांगेल त्यानुसार त्याचं काम केलं पाहिजे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे, असंही सुरेश भोळे म्हणाले आहेत.