Jalgaon Gold : सुवर्णनगरीत चांदीची मुसंडी, सोन्याची पण मोठी चढाई, काय आहेत आता किंमती?

| Updated on: Oct 04, 2024 | 3:54 PM

Jalgaon Sarafa Bazar : इराण-इस्त्रायल युद्ध सुरू असले तरी सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यानंतर ऑक्टोबरमध्ये पण दोन्ही धातुनी दरवाढीचा धबाडका लावला आहे. ऐन सुणासुदीत इतके वधारले मौल्यवान धातुचे भाव?

Jalgaon Gold : सुवर्णनगरीत चांदीची मुसंडी, सोन्याची पण मोठी चढाई, काय आहेत आता किंमती?
सोने आणि चांदी किंमत
Follow us on

जागतिक घडामोडींचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजाराने अगोदरच या परिस्थितीत नांगी टाकली आहे. पण मौल्यवान धातुत मोठी वाढ झाली आहे. इराण-इस्त्रायल युद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीकडे मोर्चा वळवला आहे. जागतिक बाजारात सध्या सोने 2700 डॉलरच्या घरात आहे. ते 3 हजार डॉलरच्या घरात पोहचू शकते. भारतात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. या काळात सोने आणि चांदीत मोठी तेजी येऊ शकते. जळगावच्या सराफा बाजारात अशा वधारल्या किंमती…

चांदीची मुसंडी, सोने इतके वधारले

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 300 रुपयांनी वधारले तर चांदीच्या दरात 2 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. जीएसटीसह सोन्याचे प्रति तोला 78 हजार 500 रुपयांवर दर पोहचले. तर जीएसटी सह चांदी प्रति किलो 96 हजार 700 रुपयांवर पोहचली आहे. युद्ध जन्य परिस्थितीमुळे सोन्या-चांदीचा दरावर परिणाम झाल्याची माहिती सुवर्ण व्यवसायिकांनी दिले.

हे सुद्धा वाचा

चांदी गाठणार लाखांचा टप्पा

चांदीचे दर प्रति किलो एक लाखांपर्यंत पोहोचणार असल्याचा दावा सराफ व्यावसायिकांनी केला आहे. नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीलाच जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्या- चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांची संख्या मंदावल्याचे सुवर्ण व्यवसायिकांचे म्हणणे आहे. सोने चांदीच्या दरात चढ-उतार कायम असल्याने ग्राहक खरेदी करण्यासाठी वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहेत.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,615, 23 कॅरेट 75,312, 22 कॅरेट सोने 69,263 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,711 रुपये, 14 कॅरेट सोने 44,235 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,671 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.