संजय राऊत यांच्याविरोधात शिवसेनेनंतर मनसे आक्रमक ; सभा उधळून देण्यानंतर पुतळा दहन करण्याचा इशारा…

| Updated on: Apr 22, 2023 | 6:11 PM

संजय राऊत यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवली नाही तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही मनसेच्यावतीने देण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात शिवसेनेनंतर मनसे आक्रमक ; सभा उधळून देण्यानंतर पुतळा दहन करण्याचा इशारा...
Follow us on

जळगाव : ठाकरे गट आणि शिवसेनेकडून गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सभेतूनही उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार यांच्यावर 50 खोके एकदम ओके असं म्हणत त्यांच्यावर असंविधानिक सरकार असल्याचा ठपका कायम ठेवण्यात येत आहे. तर नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमामध्ये उष्माघाताच्या त्रासामुळे काही लोकानी जीव गमवावा लागला होता.

त्यावरून सरकारवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. तर त्याचवेळी राज ठाकरे यांनीही त्या कार्यक्रमाविषयी आपले मत व्यक्त केले होते.

त्यांच्या प्रतिक्रियेनंतर राज ठाकरे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदा्र टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे आता शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही आक्रमक झाले होते.

खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि गुलाबराव पाटील यांच्यावरही त्यांनी तोफ डागली होती. त्यामुळेच आता शिवसेनेनंतर मनसेही आक्रमक होत, संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्याच इशारा जळगावमधील कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे जळगावमधील वातावरण सध्या प्रचंड तापले आहे.

जळगावामध्ये शिवसेनेपाठोपाठ मनसेही संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. उद्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे मनसेच्यावतीने संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे जळगावातले मनसचे सैनिक आक्रमक झाले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खारघर येथे झालेल्या दुर्घटनेप्रकरणी राजकारण होऊ नये असे मत व्यक्त केलं होतं.

त्यानंतर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे जळगावातील मनसैनिकांनी संजय राऊत यांचा निषेध नोंदवला आहे. पाचोरा शहरातील मनसैनिकांनी शनिवारी एकत्र येऊन बैठक घेतली होती.

या बैठकीत संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. त्यामुळे आता जळगावमधील राजकीय वातावरण तापले आहे. संजय राऊत यांनी आपली बेताल वक्तव्य थांबवली नाही तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही मनसेच्यावतीने देण्यात आला आहे.