जळगाव : राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रियेची जाहिरात निघाली आहे. मेगा भरती असून 19,460 जागांची भरती प्रकिया होणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये यातील 674 जागांची भरती होणार आहे. 25 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारीच यासंदर्भात माहिती दिली होती.
पदभरतीसाठी घोषित केलेली संवर्गनिहाय सरळसेवेची रिक्त पदे
आरोग्य पर्यवेक्षक – २
आरोग्य सेवक (पुरूष) ४०% – २
आरोग्य सेवक (पुरूष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) – ७५
आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)] – २९४
औषध निर्माण अधिकारी – १०
कंत्राटी ग्रामसेवक – ७४
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ४३
कनिष्ठ लेखा अधिकारी – ३
कनिष्ठ सहाय्यक – २८
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) – १
मुख्य सेविका / पर्यवेक्षिका – ९
पशुधन पर्यवेक्षक – २९
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – २
वरिष्ठ सहाय्यक – ५
वरिष्ठ सहाय्यक (लेखा) – ३
विस्तार अधिकारी (कृषि) – ४
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – ४२
एकूण – ६२६
ऑनलाईन पद्धतीने 5 ऑगस्टपासून अर्ज करता येणार असून 25 ऑगस्ट ही अंतिम तारीख असणार आहे. या परीक्षेसाठीचे उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळणार आहे. या पराक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 आणि मागासवर्गीय उमेदवारासांठी 18 ते 43 इतकी असणार आहे. तर दरमहा वेतन हे 19,900 ते 1,12,400 इतका असणार आहे. हा फॉर्म भरताना खुल्या वर्गासाठी 1000 रूपये तर मागासवर्गीयांसाठी 900 रूपये इतकं आहे.