देशातील सुवर्णपेठ, जळगावमध्ये सोन्याने जोरदार मुसंडी मारली. सोन्याचा भाव गगनाला पोहचला. मध्य-पूर्वेत इस्त्राईल आणि इराण यांच्यात तणाव वाढला आहे. इराणच्या हल्ल्याला इस्त्राईलने प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सोने-चांदी वधारले आहेत. त्याचा थेट परिणाम आज, 20 एप्रिल 2024 रोजी सुवर्णनगरीत दिसला. सोन्याच्या किंमतींनी सराफा बाजारात 76 हजारांचा आकडा ओलांडला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला. काही ग्राहकांनी खरेदीचा बेत पुन्हा रद्द केला.
हा तर विक्रमी भाव
देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. सुवर्णनगरीत आजपर्यंतचा सर्वात विक्रमी भाव सोन्याला मिळाल्याचे सराफा व्यवसायिकांनी सांगितले. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे भाव 74 हजार 100 रुपये एवढे आहेत. जीएसटी सह हे भाव 76 हजार 300 रुपये एवढे असून आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याने 76 हजारांचा आकडा पार केला आहे.तर दुसरीकडे चांदीने सुद्धा 85000 चा आकडा पार केला आहे. जळगावच्या सराफ बाजारात जीएसटीसह चांदीचे दर हे 85 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचा सराफ व्यावसायिक यांचं म्हणणं आहे
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 73,404 रुपये, 23 कॅरेट 73,110 रुपये, 22 कॅरेट सोने 67,238 रुपये झाले. 18 कॅरेट 55,053 रुपये, 14 कॅरेट सोने 42,941 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 82,853 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
दरवाढीची काय आहेत कारणं