Eknath Khadse : खोटी आश्वासन देऊन आंदोलन दडपण्याची देवेंद्र फडणवीस यांची जुनी रीत; एकनाथ खडसे यांचं टीकास्त्र

| Updated on: Oct 21, 2023 | 3:32 PM

Eknath Khadse on Devendra Fadnavis : जो लोग काले है, उन्हे कालाही दिखेगा!; एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटलांना असा टोला का लगावला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर बोलताना खडसे म्हणाले, खोटी आश्वासन देऊ आंदोलन दडपण्याची देवेंद्र फडणवीस यांची जुनी रीत!

Eknath Khadse : खोटी आश्वासन देऊन आंदोलन दडपण्याची देवेंद्र फडणवीस यांची जुनी रीत; एकनाथ खडसे यांचं टीकास्त्र
Follow us on

रवी गोरे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव | 21 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मागच्याच कालखंडात म्हटलं होतं की, मराठ्यांना आरक्षण मिळाला नाही तर मी स्वस्थ बसणार नाही. राजकारणात संन्यास घेईल, असं वक्तव्य केलं होतं. त्याची चित्रफित सध्या फिरत आहे. खोटी आश्वासनं देऊन आंदोलनं दडपण्याची ही देवेंद्र फडणवीस यांची जुनी रीत आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं. त्यावेळेस आमचे संकट मोचन आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे त्यांना भेटण्यासाठी गेले. त्यांना आश्वासन दिलं की 40 दिवसात तुम्हाला आरक्षण देऊ. आता तसं होताना दिसत नाहीये. खरंतर यांनीच मराठा आरक्षणासंदर्भात यांना उचकवलं आहे की तुम्हाला आरक्षण मिळेल. जरांगे पाटील यांचं उपोषण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा परिणाम येणाऱ्या लोकसभा विधानसभा यावर परिणाम होणार आहे, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे.

जरांगे पाटील यांचं सध्याचं आंदोलन हे राजकारणाच्या अलीकडे असलं तरी उद्याच्या राजकारणावर याचा दुर्गामी परिणाम होईल. जरांगेंच्या वाढत्या पाठिंब्यामुळे अनेक गाव तालुक्यांत नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. तसंच मतदानावरही बहिष्कार घातलाय. हीच स्थिती राहिली तर आगमी निवडणुकांमध्ये सरकारची मोठी अडचण होईल, असा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावरही टीकास्त्र डागलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना आलेल्या 137 कोटीच्या नोटीसवर बोलताना दाल में कुछ काला है!, असं म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना वो काले लोग है, तो उन्हे सब कालाही दिखेगा, असा टोलाही खडसेंनी लगावला आहे.