किशोर पाटील, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, चोपडा, जळगाव | 19 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात आमच्याच जास्तीत जास्त जागा निवडणून येती असा दावा केला जात आहे. भाजपकडून 45 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येण्याचा दावा केला जात आहे. अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीचे किती उमेदवरा जिंकतील यावर भाष्य केलं. महाविकास आघाडीला 30 च्या खाली जागा मिळणार नाही. कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त तो आकडा 40 च्या जवळ सुद्धा जाऊ शकतो, असं रोहित पवार म्हणाले. ते जळगावमध्ये बोलत होते.
राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीने मनसे महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा होत आहे. त्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली.राज ठाकरे यांचं दिल्लीला जाणं. आम्हाला तसं बघितलं तर पटत नाही. जे जे दिल्लीला जातात तिथं लोकांचं त्यांच्याबद्दलचं मत फार वेगळं होतं. त्यामुळे लोकं त्याबाबतीत खुश नाहीयेत. त्यामुळे अजून पुढे न जाता त्यांनी त्यांच्या बाबतीतला निर्णय हा महाराष्ट्राचे हिताचा आणि बीजेपीच्या विरोधाचा घ्यावा अशी विनंती त्यांचे कार्यकर्ते सुद्धा करत आहेत, असं रोहित पवार म्हणाले.
स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून आम्हाला ते पटत नाही राज ठाकरे साहेब यांचे भाषण आणि ते स्वतः मराठी माणूस म्हणून स्वाभिमानी आहेत. त्यावेळी स्वाभिमानी माणूस बीजेपी बरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही, असा विश्वास माझ्यासारखाला वाटतो. म्हणून मी विनंती केली होती आमच्या नेत्यांनी त्यांच्याबरोबर आणि त्यांनी आमच्या नेत्या बरोबर चर्चा करून योग्य असा महाविकास आघाडीचा निर्णय घेतला तर सामान्य लोकांना तो पटू शकतो, असं रोहित पवार म्हणाले.
आम्हाला कळालेला आहे की, राजीनामा हा त्यांनी त्यांच्या नेत्याकडे दिलेला आहे तो अॅक्सेप्ट झाला नसावा. पण गेल्या काही महिन्यांमध्ये कृषिमंत्री म्हणून त्यांचं कुठेही वक्तव्य आलेला आपण सर्वांनी बघितलेलं नाही. विम्याच्या अनेक अडचणी असताना सुद्धा सरकारकडून कुठेही ॲक्शन घेतली नाही. त्याच्याच बरोबर शेतकरी आज आमचा अडचणीत असताना शेतकऱ्यांच्या हिताचा कुठलाही निर्णय सरकारकडून घेतला गेला नाही. या सर्व प्रक्रियेमध्ये जेव्हा आमच्या शेतकरी अडचणीत आहे. तेव्हा कृषी मंत्री कुठेच दिसत नाहीत. जेव्हा थोडीफार चर्चा केली. तेव्हा असं कळालं की त्यांना ते मंत्रिपद मिळाल्यामुळे कदाचित ते नाराज असावे नाहीतर दुसरा कुठला तरी विषय असेल. म्हणून त्यांच्या नेत्याकडे त्यांनी राजीनामा हा दिलेला आहे एक्सेप्ट केला नसला तरी सुद्धा ते दिसत नाही याबाबतीत चर्चा सामान्य लोकांमध्ये आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे, असं रोहित पवार म्हणाले.