नितेश कराळे मास्तरांनी थेट मोदींच्या शिक्षणाचा मुद्दा छेडला; म्हणाले, तो फोटो…

| Updated on: Nov 11, 2024 | 3:32 PM

Nitesh Karale on PM Narendra Modi : जळगावच्या पारोळामध्ये आज शरद पवार यांची सभा झाली. महाविकास आघाडीच्या या सभेत नितेश कराळे यांनीही भाषण केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. नितेश कराळे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

नितेश कराळे मास्तरांनी थेट मोदींच्या शिक्षणाचा मुद्दा छेडला; म्हणाले, तो फोटो...
नितेश कराळे, नरेंद्र मोदी
Image Credit source: Facebook
Follow us on

जळगावातील पारोळा इथं महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेला शरद पवार यांची उपस्थिती होती. महाविकास आघाडीचे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार माजी मंत्री सतीश पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा झाली. या सभेत शरद पवार गटाचे प्रवक्ते नितेश कराळे यांनी भाषण केलं. तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाचा मुद्दा छेडला. दाढीवाल्याचे तीन फोटो भेटले तर पाठवत जा. मी त्यावर रिसर्च करतो आहे. चहा विकतानाचा, लग्नाचा आणि डिग्री घेतानाचा असे तीन फोटो भेटले तर मला पाठवा मला भेटून नाही राहिले. जी पदवी घेतली तर विषयच आपल्या पूर्ण भारतामध्ये नाही. त्या पदवीवर विद्यापीठाचे स्पेलिंग सुद्धा चुकलेला आहे, असं नितेश कराळे म्हणाले.

जीवाची बाजी लावून शरद पवार हे गद्दारंच सरकार गेलं पाहिजे. यासाठी राज्यात फिरत आहेत. शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजेच म्हणून शरद पवार साहेबांच्या रोजच्या चार ते पाच सभा होत आहे. तुमच्यासाठी साहेब हे करत आहे, तुम्ही साहेबांना साथ द्याल का?, असं कराळे गुरुजी म्हणाले. लोकांनी त्याला होकार दिला.

अमित शाहांवर निशाणा

अमित शाह यांना लाज वाटत नाही का? ते शरद पवार साहेबांना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणतात. मराठीत म्हण आहे आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याच पाहावं वाकून… ज्यांना गुजरात मधून अध्यापार केला त्यांनी आम्हाला सांगावं का? ज्यांनी छत्रपतींच्या पुतळा सुद्धा सोडला नाही महाराष्ट्राची अस्मिता मातीत मिसळण्याचा काम या मिंधे सरकारने केला. 23 तारखेला आपला सरकार बसेल. या ठिकाणाहून आपला एक आमदार केला पाहिजे आणि महाविकास आघाडीला भक्कम केला पाहिजे असं मला वाटतं, असं नितेश कराळे म्हणाले.

लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले?

तुला कुठे झोला घेऊन जायचं आहे ते जाय.. आम्हाला काय भिकारी करून राहिला कायले आमच्या मागे लागला. लाडक्या बहिणींना 15 लाखांवरून पंधराशे रुपये वर आणले. बहिणींनी पैसे भेटले आणि जावई वावरात हिंडून राहिला. शेतकऱ्याचा कर्ज माफ करायला याच्याकडे साल्याकडे पैसे नाहीत. पंधराशे रुपयांनी महिलांचा सन्मान होत नाही. दिवाळीचा किराणा सुद्धा झाला नाही. त्यात. तो केव्हाही पैसे परत मागू शकतो.आता एका घरात तीन तीन महिलांनी पैसे भरले त्यामुळे तुम्हाला नोटीस येईल दोघांपैकी एकाचे पैसे परत करा, असं म्हणत कराळेंनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलंय.