एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसेंनी देखील पत्रकार परिषदेत आपण पुन्हा भाजपत जाणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश नक्की कधी होणार? यावर एकनाथ खडसेंच्या सूनबाई आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भाष्य केलंय. जिल्ह्यातील दोन मोठे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. नाथाभाऊ मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतीलच. योग्य वेळी नाथाभाऊंचा प्रवेश होईलच, असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.
माझी इच्छा आहे की, भारतीय जनता पार्टी सोबत जेवढे लोक जोडतील. तेवढ्या आमच्या पक्षाची ताकद वाढेल. नाथाभाऊ हे भाजप मधील खूप जुने नेते आहेत. त्यामुळे गिरीश भाऊ आणि नाथाभाऊ यांनी एकत्र येऊन काम केलं. तर जिल्ह्याच्या विकासासाठी चांगलंच आहे. नाथाभाऊ आणि गिरीश भाऊ यांना एकत्र आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. गेल्या चार-पाच वर्षापासून मी या दोघांचा संघर्ष बघत आलेली आहे. परंतू आता या दोघांनी एकत्र आलं पाहिजे. अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे या दोघे ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. मागील काळामध्ये जेव्हा या दोन्ही नेते एकत्र होते तेव्हा जळगाव जिल्ह्यासाठी खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून झाला आहे. मात्र मागील काळात काही नाथाभाऊंच्या आणि काही गिरीश भाऊंच्या ज्या चुका झालेल्या आहेत. एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. आता चांगली संधी आहे हे आरोप प्रत्यारोप थांबून दोघांनी एकत्र आला पाहिजे. कारण गिरीश भाऊ स्वतः मंत्री आहेत आणि जिल्ह्यात आता चार मंत्री आहेत, असं रक्षा खडसेंनी म्हटलंय.
आता चांगली संधी आहे हे आरोप प्रत्यारोप थांबून दोघांनी एकत्र आला पाहिजे. कारण गिरीश भाऊ स्वतः मंत्री आहेत आणि जिल्ह्यात आता चार मंत्री आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन जर काम केलं तर नक्कीच आपला जिल्ह्याचा खूप चांगला विकास होईल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी व्यक्त केला.