जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातील राजकीय समिकरणांकडे सर्वांचं लक्ष आहे. भाजपने पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांनी लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी यंदाची लोकसभा निवडणूक आणि राजकीय समिकरणं यावर स्पष्ट भाष्य केलं. आपण ही लोकसभा निवडणूक जिंकू असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे. त्या जळगावच्या रावेरमध्ये बोलत होत्या.
माझे कुटुंबीय नसलं तरी सर्व भारतीय जनता पार्टीचा परिवार, पूर्ण संघटन माझ्या पाठीशी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन हे सर्व पाठीशी उभे आहेत. सर्वांनी माझी विजयाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे कुटुंबियांची कमतरता मला जाणवत नाही. महायुती ही निवडणूक जिंकणारच आहे, असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे.
भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्याबाबत त्यांच्या नणंद राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी काही प्रश्न उपस्थित केले होतेय. जो उमेदवार शेतकऱ्यांसाठी लढेल. तो उमेदवार विजयी होईल. आचारसंहितेत खतांच्या पिशव्यांवर पंतप्रधानांचे फोटो पाहायला मिळतायेत, असं म्हणत रोहिणी खडसेंनी प्रश्न केला होता. त्याला रक्षा खडसे यांनी उत्तर दिलं आहे. मी शेतकऱ्यांच्यासाठीच लढतेय. त्यांनी जो विषय मांडलाय. तो बरोबर आहे. त्यातच खताच्या पिशवीवरून मोदींचा फोटो तुम्ही पुसणार. मात्र जनतेच्या मनातील मोदी कसे पुसणार?, असं म्हणत रोहिणी खडसेंच्या प्रश्नाला रक्षा खडसेंनी प्रतिउत्तर दिलं आहे.
आशीर्वाद आपण प्रत्येकाचे घेत असतो. तो विरोधी नेता असो किंवा कोणी शेवटी ही आपली संस्कृती आहे. चांगलं काम करण्यासाठी आशीर्वाद घ्यावेच लागतात. त्यांना मतदान करायचं किंवा नाही हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. याच निमित्ताने एका कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश दादा जैन मी भेट घेऊन आशीर्वाद घेतला त्यांनी देखील सांगितलं तुमचा विजय आहे.एककाळ असा होता सुरेश दादा जैन आणि नाथाभाऊ हे कट्टर दुश्मन होते. मात्र त्यांनी माझ्या बाबतीत कुठेही कटुता ठेवली नाही. प्रचाराला जाईल तेव्हा सर्वच विरोधी नेते यांचा आशीर्वाद मी घेणारच आहे, असं देखील रक्षा खडसे म्हणाल्या.