रोहिणी खडसे यांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा म्हणाल्या, तालुक्याचा खेळखंडोबा…

| Updated on: May 15, 2024 | 3:57 PM

Rohini Khadse on Gulabrao Patil and Chandrakant Patil : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार निशाणा साधला आहे. यात त्यांनी तालुक्याच्या विकासावर बोलताना गुलाबराव पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. वाचा...

रोहिणी खडसे यांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा म्हणाल्या, तालुक्याचा खेळखंडोबा...
रोहणी खडसे, नेत्या राष्ट्रवादी
Follow us on

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसंच आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही रोहिणी खडसेंनी निशाणा साधला आहे. बोदवडचा पाणीपुरवठा, पाणी उपसा सिंचन योजनेवरून रोहिणी खडसे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. जल जीवन मिशन योजनेचा बोदवड तालुक्यात खेळखंडोबा झालाय. कॉन्टॅक्टरना काम कसं देता येतील आणि पैसा कसा कमवून घेता येतील यावरच मंत्री गुलाबराव पाटलांचा भर आहे, असं रोहिणी खडसे म्हणाल्या.

बोदवड इथल्या उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण आहे. तर दुसरीकडे दुसरी कुठली उपाययोजना होत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. याच विषयावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी पाणीपुरवठामध्ये गुलाबराव पाटील तसंच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

बोधवड तालुक्यातील पाणी प्रश्नावरून रोहिणी खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्ताधारी आमदार असताना सुद्धा चंद्रकांत पाटील बोदवड तालुक्यात नागरिकांना पाणी देण्यासाठी कमी पडताहेत, असं म्हणत रोहिणी खडसे यांनी बोदवडच्या पाणीटंचाईच्या विषयावरून आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर सुध्दा निशाणा साधला आहे.

गुलाबराव पाटलांवर टीका

पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेचा बोदवड तालुक्यात खेळखंडोबा झालाय. केवळ या योजनेत कॉन्ट्रॅक्टरांना कसे काम देता येतील. पैसे कसे कमवता येतील, यावरच भर दिसतोय, असं म्हणत रोहिणी खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटलांवर निशाणा

आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही रोहिणी खडसे यांनी टीकास्त्र डागलं आहे. चंद्रकांत पाटील हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे. असं असताना बोदवड तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी त्यांनी बोलणं अपेक्षित आहे. त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मात्र ते कुठल्याही प्रयत्न करताना दिसत नाहीये. पाणी देण्यासाठी ते अपयशी ठरतात. म्हणून नागरिकांचे हाल होत आहेत, असं म्हणत रोहिणी खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.